एक्स्प्लोर
CCTV : कारच्या धडकेत स्कूटीवरील व्यक्ती 20 फूट उंच हवेत उडाला
कारच्या धडकेनंतर स्कूटीवर स्वार असलेल्या दोघांपैकी मागे बसलेला एक जण 20 फूट उंच हवेत उडाला, त्याचा जागीच मृत्यू झाला.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका भरधाव कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. पश्चिम विहारमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघाताचा थरार दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
कारच्या धडकेनंतर स्कूटीवर स्वार असलेल्या दोघांपैकी मागे बसलेला एक जण 20 फूट उंच हवेत उडाला, त्याचा जागीच मृत्यू झाला. तर स्कूटी चालवणारा व्यक्ती आणि पादचारी गंभीर जखमी झाला आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये भरधाव कार तिरक्या दिशेने येताना दिसत आहे. त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही कार दुचाकी तसंच पार्किंगमधील इतर गाड्यांना धडक देते. रस्त्यालगतच्या नाल्याची भिंत तोडून ही कार खाली कोसळते.
दरम्यान, आरोपी कार चालकाला पोलिसांनी अटक केली. परंतु काही तासातंच जामीनावर त्याची सुटकाही झाली आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement