एक्स्प्लोर

राजकीय तमाशात सीबीआय नावाच्या पोपटाची पिसं का निघतात?

तपास सीबीआयकडे गेला की तो वेगाने, निष्पक्षपणे होणार असा एकेकाळचा समज आता पूर्णणे फोल ठरत चालला आहे. सरकार कुणाचंही असो सीबीआयला केवळ राजकीय फायद्यासाठी वापरलं जाऊ लागलं आणि या संस्थेने आपली प्रतिष्ठा घालवली.

नवी दिल्ली : सीबीआय विरुद्ध सीबीआय या नाट्याचा दिल्लीतला गोंधळ संपतोय तोवरच आता कोलकात्यात पोलीस विरुद्ध सीबीआयचा खेळ सुरु झाला आहे. देशाच्या इतिहासात आजवर कधीही घडलं नाही ते काल पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालं. जे सीबीआयचे अधिकारी चौकशी करायला पोहोचले होते, त्यांनाच अटक करुन कोलकाता पोलिसांनी ठाण्यात डांबलं. देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेची अशी लक्तरं अशी वारंवार का टांगली जात आहेत. सीबीआय म्हणजे सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट बनल्याची टिपण्णी सुप्रीम कोर्टानेच काही वर्षांपूर्वी केली होती. या पोपटाची पिसं वारंवार का काढली जात आहेत? पश्चिम बंगालमध्ये जो अभूतपूर्व गोंधळ सध्या सुरु आहे त्यापाठीमागची खरी लढाई मोदी विरुद्ध ममता अशी आहे. 2014 चा हिंदी बेल्टमधला परफॉर्मन्स भाजपला 2019 ला रिपीट करणं शक्य नाही. ज्या जागा कमी होणार त्या बंगाल, ओडिशासारख्या राज्यातून भरुन काढण्याचा भाजपचा प्लॅन आहे. पण या राजकारणात सीबीआयसारख्या संस्थेला ओढलं जातंय का असाही प्रश्न आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या टायमिंगला ही कारवाई करण्यात आलीय त्यामुळे सीबीआय केवळ वापरली जातेय असं म्हणायलाही वाव उरतो. कालची कारवाई ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच होतेय असं भाजपचं म्हणणं आहे. पण सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातल्या तपासाचा शेवटचा आदेश 2014 मध्ये दिलेला आहे. मग इतकी वर्षे गेल्यानंतर अचानक निवडणुकीच्या तोंडावर सीबीआयला याची प्राथमिकता का आठवली? कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार हे शारदा चीटफंडचे अनेक पुरावे नष्ट करुन पाहत आहेत, असाही सीबीआयचा दावा आहे. पण कुठल्याही पुराव्याविना सीबीआयच्या या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, त्यामुळे आधी पुरावे घेऊन या असं सुप्रीम कोर्टानेही आज सीबीआयला सुनावलं आहे.
सीबीआय विरुद्ध सीबीआय वादात आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. या आरोपांमुळे सीबीआयमध्ये गटबाजीचे किती गलिच्छ प्रकार चालतात, त्यासाठी कुठल्या थराला हे अधिकारी जातात हेही जनतेसमोर आलं. त्यानंतर आता राजकीय फायद्यासाठी सीबीआयची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत. सीबीआयच्या अशाच वापरामुळे आंधप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकताच एक नवा कायदा राज्यात बनवला. जोपर्यंत राज्याची परवानगी नाही, तोपर्यंत सीबीआय आंध्रात पाऊल ठेवू शकणार नाही या त्यांच्या कायद्याचं अनुकरण इतरांनीही केलं आहे. अशा गोष्टी वाढत जाणं हे देशाच्या संघीय व्यवस्थेला धोका पोहोचवणारं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राजीवकुमार यांना इतक्या आक्रमकतेने का वाचवत आहेत, राजीवकुमार यांनी सीबीआयपासून खरंच काही लपवलं आहे असे प्रश्न चर्चिले जात आहेत. त्यासोबतच जी भाजप आज शारदा चीटफंड घोटाळ्यातल्या पीडितांचा कळवळा दाखवतेय, त्यांनी या घोटाळ्यातले एक आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे माजी नेते मुकूल रॉय यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन कसं पवित्र केलं हाही प्रश्न उपस्थित व्हायला हवा.
- सीबीआयची स्थापना दिल्ली स्पेशल पोलीस अॅक्टनुसार झाली आहे - केंद्रीय सेवांमधली भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या चौकशीची जबाबदारी - सीबीआयला राज्यसरकारच्या परवानगीनेच कार्यक्षेत्र वाढवता येतं - आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड राज्ये वगळता अशी परवानगी आहे - केंद्राशी संघर्षानंतर राज्य सरकार सीबीआयची परवानगी रद्द करतात
तपास सीबीआयकडे गेला की तो वेगाने, निष्पक्षपणे होणार असा एकेकाळचा समज आता पूर्णणे फोल ठरत चालला आहे. सरकार कुणाचंही असो सीबीआयला केवळ राजकीय फायद्यासाठी वापरलं जाऊ लागलं आणि या संस्थेने आपली प्रतिष्ठा घालवली. काल कोलकात्याच्या रस्त्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी अडवलं, त्यांच्याशी झटापट केली, त्यांना मानगुटीला धरुन ठाण्यात डांबलं. निवडणुका येतील, जातील..पण उद्या सीबीआयसारख्या संस्थेला कुठलं राज्य जुमानू लागलं नाही तर अराजकता निर्माण होईल याचाही विचार सत्ताधीशांनी करायला हवा. या सगळ्या सर्कशीला नेमका कोण रिंगमास्टर कारणीभूत आहे?

महत्त्वाच्या बातम्या

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Udayanidhi Stalin On Trisha Krishnan Thalapathy Vijay Relation: त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात
त्रिशा कृष्णनविषयी डबल मिनिंग वक्तव्य, तामिळनाडूचं राजकारण तापलं, उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

Embed widget