एक्स्प्लोर
‘कनिष्क गोल्ड’चा 14 बँकाना 824 कोटींचा चुना
केजीपीएलने 2008 सालाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे गेल्या 10 वर्षात बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून पैसे घेतले.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 540 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता आणखी एका ज्वेलरी व्यापाऱ्याने भारतातील बँकांना चुना लावल्याचे उघड झाले आहे. 14 बँकांमधील 824 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने कनिष्क गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड (केजीपीएल) कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने केजीपीएलच्या संचालकांची चौकशीही सुरु केली असून, बुधवारीच केजीपीएलच्या ऑफिसवर छापे मारले होते. सीबीआय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “सीबीआयच्या बंगळुरुतील कार्यालयात केजीपीएलचे संचालक भूपेश कुमार जैन आणि नीता जैन यांची चौकशी केली जात आहे.” चेन्नईस्थित कनिष्क गोल्डने 14 बँकांना 824 कोटी 15 लाख कोटींचा चुना लावल्याचे प्रकरण बुधवारी समोर आले होते. 'कनिष्क गोल्ड'ला कुठल्या बँकेने किती रुपयांचे कर्ज दिले?
- एसबीआय – 240 कोटी
- पंजाब नॅशनल बँक – 128 कोटी
- बँक ऑफ इंडिया – 46 कोटी
- आयडीबीआय – 49 कोटी
- सिंडिकेट बँक – 54 कोटी
- यूनियन बँक – 53 कोटी
- यूको बँक – 45 कोटी
- सेंट्रल बँक – 22 कोटी
- कॉर्पोरेशन बँक – 23 कोटी
- बँक ऑफ बडोदा – 32 कोटी
- तामिळनाडू मर्कंटाईल बँक – 27 कोटी
- एचडीएफसी – 27 कोटी
- आयसीआयसीआय बँक – 27 कोटी
- आंध्र बँक – 32 कोटी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















