एक्स्प्लोर
CBI कडून आठवड्याभरात तृणमूलच्या दुसऱ्या खासदाराला अटक
नवी दिल्ली : सीबीआयने कथित रोज वेली चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी तृणमूल काँग्रेसचे लोकसभा खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केली आहे. आठवड्याभरात तृणमूलच्या दुसऱ्या खासदाराला अटक करण्यात आली आहे.
बंडोपाध्याय काल 11 वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांच्यासोबत सखोल चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीनंतर त्यांना सीबीआयने अटक केली. अटकेपूर्वी सीबीआयने त्यांना तीन वेळा समन्स बजावला होता.
कथित रोज वेली घोटाळ्याप्रकरणी बंडोपाध्याय यांच्यापूर्वी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल यांनाही अटक करण्यात आली होती. तपस पाल सध्या भुवनेश्वरमध्ये सीबीआयच्या ताब्यात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement