Uttar Pradesh : अनेक लोक टॅटू गोंदवून घेण्याआधी काही गोष्टींचा विचार करतात. कोणत्या डिझाइनचा टॅटू गोंदवून घ्यायचा? टॅटू गोंदवून घेणं सेफ आहे का? टॅटू गोंदवून घेताना दुखणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न टॅटू गोंदवून घेण्याआधी पडतात. पण टॅटू गोंदवून घेणं उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) 14 जणांना महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 14 जणांना टॅटूसाठी वापरण्यात आलेल्या सुईनं मृत्यूच्या दाढेत ढकललंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
उत्तर प्रदेशातील धक्कादायक प्रकार
उत्तर प्रदेशामध्ये 14 जाणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. पण त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्या 14 जणांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. या चाचणीमधून त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदान झाले. या 14 जाणांची विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवला नव्हता. या 14 जणांनी ज्या टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला त्या आर्टिस्टनं पैसे वाचण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता, असं नंतर लक्षात आलं.
टॅटू गोंदवून घेण्याआधी अशी घ्या काळजी
जर एखाद्या एचआयव्हीग्रस्ताने टॅटू गोंदवून घेतला आणि त्याला वापरण्यात आलेली सुई ही इतरांना वापरली तर त्या सर्व लोकांना एड्स होऊ शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी टॅटू आर्टिस्ट हा नव्या सुईचा वापर करत आहे की नाही? याची खात्री करुन घ्या. टॅटू गोंदवून घेतल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास तो टॅटू कापसाने कव्हर करा.
वाचा इतर बातम्या:
- Trending : टॅटू काढणं मॉडेलला पडलं महागात; चेहरा बिघडला, बदललं आयुष्य
- World Record : 'या' महिलेनं 25 वर्षं कापली नाहीत नखं, नखांची लांबी 42 फूट; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकमध्ये नोंद