Trending : अनेकांना वेगवेगळे टॅटू काढण्याची आवड असते. पण टॅटू काढताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते. अनेक वेळा टॅटू काढताना वापरण्यात येणाऱ्या सुईमुळे किंवा त्यामध्ये टाकणार येणाऱ्या रंगामुळे शरीरावर रॅश येऊ शकते. अशीच एक घटना सिडनीमधील नॉर्दन येथे राहणाऱ्या टिली व्‍हाइटफील्‍ड (Tilly Whitfeld) नावाच्या महिलेसोबत घडली. टॅटू काढल्यामुळे टिलीचा चेहरा खराब झाला. तिला तात्पुरते अंधत्वही आले होते.  टॅटूमुळे झालेल्या या हानीमुळे  टिलीचं आयुष्य बददलं ती सध्या उपचार घेत आहे. 


22 वर्षाची टिली व्‍हाइटफील्‍ड ही सोशल मीडिया इंफ्लुएंसर आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, टिलीला टॅटू काढल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. तिच्या नाकावर आणि संपूर्ण चेहऱ्यावर रॅश आली. टिलीनं टॅटू काढण्यासाठी  सेविंग नीडल आणि  इंकचा वापर केला. हे प्रोडक्ट तिनं ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर केले होते.  टिली व्‍हाइटफील्‍डनं ऑस्‍ट्रेलियामध्ये 'बिग ब्रदर' च्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. 






रिपोर्टनुसार, टिली ही  'होम टॅटू हॅक' चा वापर करत होती. त्यासाठी लागणारे सेविंग नीडिल आणि इंक तिनं ऑलाइन पद्धथीनं ऑर्डर केले. पण या वस्तू या चांगल्या क्वालिटीच्या नव्हत्या. त्यामुळे टिलीच्या चेहऱ्यावर इनफेक्शन झाले. टिलीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून या टॅटूबद्दल लोकांना माहिती दिली.  


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha