US Woman Guinness World Record : जगभरातील लोक विश्व विक्रम करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. कधीकधी काही विक्रम फार वेगळे असतात. असाच काहीसा अनोखा विक्रम अमेरिकेतील (US Woman) एका महिलेने केला आहे. अमरेकेतील या महिलेच्या नावे जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम आहे. अलिकडेच या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंदवण्यात आलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मंगळवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, अमेरिकेच्या (America) मिनेसोटा येथील महिलेच्या नावावर हा नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, अमेरिकेतील डायना आर्मस्ट्राँग (Diana Armstrong) या महिलेच्या दोन्ही हातांच्या नखांची एकूण लांबी 42 फूट 10 इंच इतकी आहे. डायनाने मागील 25 वर्षांपासून हातांची नखं कापलेली नाहीत.
सर्वात लांब नखांचा विश्वविक्रम
अमेरिकेतील डायना आर्मस्ट्राँग (Diana Armstrong) या महिलेच्या नावावर सर्वात लांब नखांचा विश्वविक्रम आहे. डायनाच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट आहे. डायनाच्या नावे सर्वात लांब नखांचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे. डायनाने मागील 25 वर्षांपासून हातांची नखं कापलेली नाहीत. डायनाने 1997 साली शेवटी नखं कापली होती. त्यानंतर डायनानं नखं कापलेली नाहीत.
पाहा व्हिडीओ : जगातील सर्वात लांब नखं असणारी महिला
मुलीच्या आठवणीत वाढवली नखं
डायनाचं नखं वाढवण्याचं कारण विश्वविक्रम करणं नव्हतं. डायना आर्मस्ट्राँगने (Diana Armstrong) मुलीची आठवण म्हणून नखं वाढवण्यास सुरुवात केली. डायनाची मुलगी 16 वर्षांची असताना तिचा दम्यामुळे मृत्यू झाला. डायनाची मुलगी हयात असताना डायनाची नखं कापून त्यांना नेलपेंट लावायची. तिचा मृत्यू होण्याची आदल्या दिवशीही तिने डायनाच्या नखांना नेलपेंट लावली होती. यामुळे डायनाने दिवंगत मुलीच्या आठवणीत नखं वाढवण्यास सुरुवात केली.