PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची (NITI Aayog) सातवी बैठक होणार आहे. ही बैठक नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमधील सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पीक विविधता, तेलबिया आणि कडधान्यांच्या बाबतीत तसेच कृषी समुदायांमध्ये आत्मनिर्भरता यावर देखील चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, शालेय शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, उच्च शिक्षण आणि शहरी प्रशासन या विषयांवर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.


नितीश कुमारांसह के चंद्रशेखर राव उपस्थित राहणार नाहीत


आज होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विधानमंडळासह सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, पदसिद्ध सदस्य, नीती  आयोगाचे उपाध्यक्ष, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश देखील असणार आहे. आजच्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी या बैठकीपासून फारकत घेतली आहे. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. 


13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशवासियांनी घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचे आवाहन


भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. अशा परिस्थितीत सर्वच राज्यांनी  स्वावलंबी होऊन सहकारी संघराज्यवादाच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारता'कडे वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशवासियांनी घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमातून आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा लावून देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये तिरंग्याचा फोटोही अपलोड केला आहे. याशिवाय सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनीही आपला प्रोफाईल पिकला तिरंगा ठेवला आहे. स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारताच्या निर्मितीच्या दिशेने आज NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची 7 वी बैठक होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: