एक्स्प्लोर

साताऱ्याच्या पोरीनं उंचावली देशाची मान; मुमताज बनली कॅनडाची एका दिवसाची कॉन्सुल जनरल, नेमकं काय झालं? 

कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील (Maharashtra Satara Mumtaj Mulani) सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली.

Canada consul general : कॅनडाचे वाणिज्य दूतावास म्हणून महाराष्ट्रामधील साताऱ्यातील (Maharashtra Satara Mumtaj Mulani) सोळा वर्षीय मुमताज मुलानीला कॉन्सुल जनरल बनण्याची संधी आज मिळाली. याचं कारण होतं 10 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय मुलगी दिवस.  यंदा दहाव्या आंतरराष्ट्रीय मुलगी दिनाच्या (International Girl Child Day) निमित्ताने मुंबईतील कॅनडाचे वाणिज्य दूतावासाकडून 7 ऑक्टोबर 2022 रोजी "एक दिवसासाठी महावाणिज्यदूत" कार्यक्रम राबवण्यात आला. 

यात मानदेशी फाउंडेशन या  NGO च्या सहकार्याने मुमताज मुलानी या साताऱ्याच्या मुलीला कॅनडाचे मुंबईतील महावाणिज्यदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 16 वर्षीय मुमताज ही साताऱ्यातील पुलकोटी गावातील तरुण कुस्तीपटू आहे. आज एक दिवस संपूर्ण तिने कॉन्सुलचे जीवन जगले.

मुमताजसारख्या तरुण मुलींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आयुष्यात समर्थ बनवण्यासाठी कॅनडा कॉन्सुलचा या मागे हेतू होता. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता कॅनडाच्या कॉन्सिलेट जनरल यांनी आपला पदभार मुमताजला सोपवला. नंतर मुमताजने संपूर्ण दिवस मुंबईतील कॅनडाच्या वाणिज्य दूतावासाचे कार्यालय सांभाळलं आणि काम देखील केलं.

दिवसभरात मुमताजने अनेकांसोबत बैठका घेतल्या

ही संधी मिळताच दिवसभरात मुमताजने अनेकांसोबत बैठका घेतल्या., कॅनडा आणि भारत यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याविषयी तसेच भारतीय आणि कॅनडातील महिलांच्या विकासासाठी अनेकांशी चर्चा केल्या. यात एका ग्रामीण भागातल्या मुलीला ही संधी मिळाल्यामुळे यामध्ये अनेक मुलींचा फायदा आहे असं तिला सहकार्य करणाऱ्या मानदेशी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आलं.

मुलींना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

10 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय मुलींचा दिवस आहे, ज्याची घोषणा युनायटेड नेशन्सने 2011 मध्ये मुलींचे हक्क आणि जगभरातील मुलींना भेडसावणारी अनोखी आव्हाने ओळखण्यासाठी केली होती.  कॅनडा कॉन्सुलने यावर्षी आंतरराष्ट्रीय मुलगी दिनाच्या निमित्ताने या दिवसाचे औचित्य साधून भारतातील मुलींना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि जागरूकता निर्माण करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आज कॅनडाच्या कॉन्सुल जनरलचं कार्य कसं असतं हे एका मुलीला कळावं आणि पुढे तिने देखील त्यातून प्रेरणा घेत काहीतरी करावं म्हणून महाराष्ट्रातील एका मुलीलाच्या कॉन्सुल जनरल बनण्याची संधी दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

Satara News : कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्या घरात घुसला, पण शेतकऱ्याच्या प्रसंगधावनाने झाला जेरबंद! सातारमधील थरारक प्रसंग

 

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: हे सर्व फक्त आमदार, राजकीय पक्ष नाही; शिंदे सरकार स्थापन झालेच नसते; कपील सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत काय काय घडलं?
हे सर्व फक्त आमदार, राजकीय पक्ष नाही; शिंदे सरकार स्थापन झालेच नसते; कपील सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या अंतिम सुनावणीत काय काय घडलं?
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget