एक्स्प्लोर
यापुढे वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड!
नवी दिल्ली: वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्यास यापुढे तुम्हाला दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे. कारण वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
त्यामुळे तुम्ही वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल. तर दारु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये नाही तर एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्ही वाहतुकीचे नियम तोडले तर तुम्हाला जास्तीचा भुर्दंड भरावा लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement