एक्स्प्लोर

CAA : लोकसभा निवडणुकीआधी CAA लागू होणार? अधिकाऱ्यांने दिली महत्त्वाची माहिती

CAA laws : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकार CAA 2019 चे नियम अधिसूचित करणार असल्याची माहिती आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

CAA Rules Notified : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठा निर्णय घेऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकार CAA 2019 चे नियम अधिसूचित करणार असल्याची माहिती आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या CAA अंतर्गत, 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या छळ झालेल्या मुस्लिमेत्तर स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान केले जाईल. संसदेने डिसेंबर 2019 मध्ये संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती आणि नंतर राष्ट्रपतींकडून संमती मिळाल्यानंतर, त्याच्या निषेधार्थ देशाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली.

अधिकाऱ्याने काय सांगितले?

अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही लवकरच सीएएचे नियम जारी करणार आहोत. नियम जारी झाल्यानंतर, कायद्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. कायद्याला चार वर्षांहून अधिक काळ विलंब झाला असून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियम आवश्यक आहेत.

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. पुढील लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कायद्याचे नियम अधिसूचित केले जातील का, असे विचारले असता या अधिकाऱ्याने निवडणुका जाहीर होण्याआधीच अधिसूचना जारी होईल असे म्हटले. अधिकाऱ्याने सांगितले की नियम तयार असून ऑनलाइन पोर्टलही तयार आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. अर्जदारांनी योग्य कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे वर्ष घोषित करणे आवश्यक आहे. अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत.

काय म्हणाले होते अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 27 डिसेंबर रोजी म्हटले होते की CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही. हा देशाचा कायदा आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.

कोलकाता येथे पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना शाह म्हणाले होते की सीएए लागू करणे ही भाजपची वचनबद्धता आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस CAA ला विरोध करत आहे. पश्चिम बंगालमधील गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत CAA लागू करण्याचे आश्वासन हा भाजपचा प्रमुख निवडणूक मुद्दा होता.

किती लोकांना जीव गमवावा लागला?

नियम बनवण्यासाठी गृह मंत्रालय 2020 पासून नियमित अंतराने संसदीय समित्यांकडून मुदतवाढ घेत आहे. सीएएच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात किंवा पोलिसांच्या कारवाईत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget