Budget 2021 : कोरोना महामारीच्या संकटानंतर केंद्र सरकारने 2021 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत अशासकीय संस्थांच्या (एनजीओ) सहभागाने 100 नवीन शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर 15,000 शाळांना आणखी सुसज्ज करण्यात येणार आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, लेह येथे एक केंद्रीय विद्यापीठ सुरू केले जाईल, तर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 100 सैन्य शाळा सुरू केल्या जातील. यासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत 15000 शाळा अधिक चांगल्या आणि अद्ययावत करण्यात येणार आहेत


आदिवासी भागात 750 एकलव्य मॉडेल निवासी शाळा सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे.अशा शाळांची युनिट किंमत 20 कोटी रुपयांवरून 38 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे आणि डोंगराळ व दुर्गम भागांसाठी या योजनेत वाढ करुन 48 कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विकास आणि मुलभूत सुविधांमध्ये मदत होईल, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.


कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकार 35 हजार कोटी देणार, अर्थमंत्र्यांची घोषणा


अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी आम्ही पोस्ट-मेट्रिक-शिष्यवृत्ती योजनेचे पुनरुज्जीवन केले आहे. या संदर्भात आम्ही केंद्राची मदतही वाढवली आहे. केंद्र सरकार 2025-२6 पर्यंत सहा वर्षांच्या कालावधीसाठी अनुसूचित जातीच्या 4 कोटी विद्यार्थ्यांसाठी,35 हजार 219 कोटींचे वाटप करणात आहे.


कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्रातचं बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये केलं आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील.


संबंधित बातम्या