(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Elections 2024 : मायावतींची उत्तर प्रदेशात सर्वात मोठी घोषणा; सीएम योगींसाठी किती तापदायक होणार?
Lok Sabha Elections 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींची उत्तर प्रदेशमधील ही पहिली रॅली आहे आणि या रॅलीद्वारे त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसपाने मोठी घोषणा केली आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यास पश्चिम उत्तर प्रदेश वेगळे राज्य घोषित केले जाईल, अशी मोठी घोषणा मुझफ्फरनगरमधील निवडणूक सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे. मायावती यांनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ देखील स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आमचा पक्ष काम करण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे जाहीरनामा जारी करत नाही, असे मायावती म्हणाल्या.
भाजप सरकारमध्ये तपास यंत्रणेचे राजकारण
माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या की, काही काळ केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, भाजप सरकारमध्ये तपास यंत्रणेचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या सरकारमध्ये जातीवाद आणि जातीयवाद पसरलेला आहे. त्यांच्या सरकारमध्ये नाट्य, वक्तृत्व आणि हमीभाव यांचा काही उपयोग नाही. भाजप सरकारची विचारसरणी जातीवादी आहे.
#WATCH | Muzaffarnagar, UP: BSP chief Mayawati addresses a public meeting.
— ANI (@ANI) April 14, 2024
She says, "In western UP, the then opposition parties used to say that BSP is against the upper caste. They used to advertise that BSP was against the Jaat community. But you all know, BSP never let any… pic.twitter.com/N9pGeYKBif
आम्ही मुस्लिम समाज आणि जाट समाजामध्ये बंधुभाव निर्माण केला
मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशात माझ्या नेतृत्वाखाली 4 वेळा सरकार स्थापन झाले आहे. आमच्या सरकारमध्ये जातीय दंगली झाल्या नाहीत, पण सपा सरकारमध्ये जाट आणि मुस्लिम समाजाला आपसात भांडायला लावले गेले आणि समाजात फूट पाडली गेली. येथे आम्ही अत्यंत मागास समाजातील सदस्याला तिकीट दिले आणि या जागेवर आम्ही मुस्लिम समाज आणि जाट समाजामध्ये बंधुभाव निर्माण केला. मला मुझफ्फरनगरमधून मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा करायचा होता पण मुस्लिम समाजातील कोणीही उमेदवारी करायला तयार नव्हते.
2024 च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात मायावतींची उत्तर प्रदेशमधील ही पहिली रॅली आहे आणि या रॅलीद्वारे त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. यापूर्वी मायावतींचा पुतण्या आकाश आनंद पक्षाच्या वतीने निवडणूक रॅलींमध्ये विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत आहे. यूपीमध्ये भाजप आता पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. यूपीच्या 80 जागांवर बसपा एकटाच निवडणूक रिंगणात आहे, मायावतींनी कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या