एक्स्प्लोर

RSS कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, ATSच्या माहितीवरून तामिळनाडू पोलिसांनी पकडले

Bomb Blast Threats To RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Bomb Blast Threats To RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी तामिळनाडू राज्यातून अटक केली आहे. लखनौ आणि गोंडा या दोन RSS कार्यालयांना बॉम्बने स्फोटाची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

यूपी ATSच्या माहितीवरून तामिळनाडू पोलिसांतर्फे अटक

यूपी एटीएसच्या माहितीवरून तामिळनाडूच्या पुडुकोडी जिल्ह्यातील राज मोहम्मद हा व्यक्ती तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज मोहम्मद याने फोनवरून उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणांसह एकूण 6 ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. आरएसएस कार्यालयांना मिळालेल्या धमकीनंतर उन्नाव पोलिसही सतर्क झाले आहेत. पोलिसांनी आरएसएस कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. RSS कार्यालय उन्नावच्या छोटा चौराहाजवळ आहे. सोमवारी रात्री 8 वाजता लखनऊ आणि उन्नाव येथील युनियन ऑफिसला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या लिंकद्वारे ही धमकी देण्यात आली होती.

नूपूर शर्मांना धमक्या

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मांना चौफेर विरोध होत असताना ही धमकी देण्यात आली आहे. मात्र, ते सर्व धर्मांचा आदर करतात, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच कारवाई करताना पक्षाने एकीकडे नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे, तर दुसरीकडे नवीन जिंदाल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आखाती देशांमध्ये खळबळ

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या दोन नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. इस्लामिक देशांमध्ये भारताला विरोध होताना दिसत आहे. कतार आणि कुवेतनंतर इराणनेही भारतीय राजदूताला बोलावले आहे. सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले जात आहे. कतारने म्हटले आहे की, वादग्रस्त विधानामुळे मानवी हक्कांच्या संरक्षणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मावर चौफेर विरोध होत असताना ही धमकी देण्यात आली आहे. मात्र, ते सर्व धर्मांचा आदर करतात, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच कारवाई करताना पक्षाने एकीकडे नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे तर दुसरीकडे नवीन जिंदाल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद वाढला
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर कथित वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने आपल्या नेत्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. भाजपने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. यासोबतच दिल्ली भाजप नेते नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही पक्षाने कारवाई केली आहे. त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला आहे. पैगंबर मोहम्मद यांच्यावरील कथित वक्तव्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद वाढला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget