एक्स्प्लोर
एकट्या येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान!
येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी: राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली.

येडियुरप्पा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी: बंगळुरु: सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. आज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल. येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. कोण आहेत बी एस येडियुरप्पा? बूकानाकेरे सिद्दलिंगाप्पा येडियुरप्पा म्हणजेच बी एस येडियुरप्पा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1943 रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात झाला. 75 वर्षीय येडियुरप्पा यांना भाजपने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केलं होतं. राईस मिलमध्ये क्लार्क ते मुख्यमंत्री अशी येडियुरप्पांची कारकीर्द आहे. त्यांच्या चढ्या कारकिर्दीला जेलवारीचा ब्रेकही लागला. मात्र त्यातूनही त्यांनी कमबॅक केलं. राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री कोर्टाचा हिरवा कंदील सुप्रीम कोर्टाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे 5 पर्यंत ऐतिहासिक सुनावणी घेत, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. कर्नाटकच्या राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टात पहाटेपर्यंत युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा यांनी ठरवल्याप्रमाणे 17 मे रोजी 9 वा. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 भाजप 104 काँग्रेस 78 जनता दल (सेक्युलर) 37 बहुजन समाज पार्टी 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 अपक्ष 1 संबंधित बातम्या राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री कर्नाटकात भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं : काँग्रेस
आणखी वाचा























