अमित शाहांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज
अमित शाह यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबद्दल शाह यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली होती.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांना दिल्लीतील एम्स रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्यामुळे त्यांना बुधवारी (16 जानेवारीला) एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी अमित शाहांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
हम सभी के लिए हर्ष का विषय है कि हमारे यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष श्री @AmitShah जी आज पूर्ण रूप से स्वस्थ हो AIIMS से डिस्चार्ज होकर अपने निवास आ गये हैं। सभी शुभचिंतकों व कार्यकर्ता बंधुओं की शुभकामनाओं के लिए हृदय से आभार।
— Anil Baluni (@anil_baluni) January 20, 2019
अनिल बलुनी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. अमित शाह यांची प्रकृती पूर्णपणे ठीक झाली असून त्यांना आज एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व शुभचिंतक आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार."
अमित शाह यांना स्वाईन फ्लूची लागन झाल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाह यांनी स्वत: ट्वीट करुन आपल्याला स्वाईन प्लू झाल्याबद्दलची माहिती दिली होती. देवाचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांनी लवकरच बरा होईल, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.