एक्स्प्लोर
राज्यसभा उपसभापतीपद निवडणूक : शाहांचा उद्धव ठाकरेंना फोन
राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याबाबत अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएला पाठिंबा द्यावा, अशी विनंती अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गुरुवारी म्हणजेच 9 ऑगस्टला उपसभापतीपदाची निवडणूक होणार आहे.
एनडीएकडून जेडीयू खासदार हरिवंश यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अकाली दलाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अकाली दलाचे तीन खासदार मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप पुन्हा शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी 123 मतांची गरज आहे. भाजप सभागृहात सर्वात मोठा पक्ष असा असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्रपक्ष आणि काही अपक्ष अशी जोडतोड करुन भाजपचा आकडा 115 पर्यंत पोहोचतो. पण 13 खासदार असलेली एआयडीएएमके कुठल्या बाजूने मतदान करणार हे अजून निश्चित नाही.
उपसभापतीपदाची निवडणूक ही विरोधकांच्या एकीची परीक्षा घेणारी आहे. भाजपला नमवण्याची संधी असल्याने सगळे विरोधक राज्यसभेत एकत्र येणार का याची उत्सुकता आहे. विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यमंत्रिमंडळात विस्तार आणि फेरबदल होणार असून त्याबाबतही अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याचं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनांवर दोघांमध्ये बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement