एक्स्प्लोर

लोकसभा अध्यक्षपदावरून भाजप बॅकफूटवर; टीडीपीनं वाढवलं टेन्शन, निवड होते तरी कशी?

मागील दोन सरकारच्या तुलनेत भारतीय जनता पक्ष यावेळी पूर्णपणे (BJP on backfoot over Lok Sabha speaker) मित्रपक्षांवर अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत.

BJP on backfoot over Lok Sabha speaker : देशाच्या 18व्या लोकसभेसाठी 26 जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे लोकसभेचे नवीन अध्यक्ष कोण होणार? याबाबत चर्चा सुरू आहे. भारताच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की भाजपने आपल्या मित्र पक्षाला संधी दिली पाहिजे. एनडीए सरकार असल्याने यावेळी लोकसभा अध्यक्षपद महत्वाचा घटक असेल. 

मागील दोन सरकारच्या तुलनेत भारतीय जनता पक्ष यावेळी पूर्णपणे (BJP on backfoot over Lok Sabha speaker) मित्रपक्षांवर अवलंबून आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या, म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा 32 जागा कमी आहेत. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि बिहारमधील नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हे भाजपचे सहयोगी आहेत. 

टीडीपी नेत्यांचे म्हणणे आहे की लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय एनडीएच्या मित्रपक्षांनी एकत्रितपणे घ्यावा, तर जेडीयू नेते केसी त्यागी यांनी म्हटले आहे की जनता दल युनायटेड भाजपने नियुक्त केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतो.

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी होते?

राज्यघटनेच्या कलम 93 मध्ये सभापती निवडीचे नियम विहित केलेले आहेत. नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी सभापतीपद रिक्त होते. प्रक्रियेनुसार, संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करतात. लोकसभेचा अध्यक्ष साध्या बहुमताने निवडला जातो. म्हणजे सभागृहात उपस्थित असलेल्या अर्ध्याहून अधिक सदस्यांना लोकसभा अध्यक्ष होण्यासाठी विशिष्ट उमेदवाराला मतदान करावे लागते.

लोकसभा अध्यक्षांच्या अधिकारांबद्दल बोलताना, हे पद खूप महत्वाचे आहे, कारण ते सभागृह चालवण्याची जबाबदारी घेतात. लोकसभा अध्यक्ष संसदीय बैठकांसाठी अजेंडा देखील सेट करतात आणि स्थगिती आणि अविश्वास प्रस्ताव यासारख्या प्रस्तावांना परवानगी देतात. सभागृहात कोणत्याही नियमाबाबत वाद निर्माण झाल्यास सभापती या नियमांचा अर्थ लावतात आणि त्यांची अंमलबजावणीही करतात, ज्याला आव्हान देता येत नाही. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे सदस्य असल्याने सभापतींचे अध्यक्षपद निर्विवाद असावे.

संविधानाच्या 10 व्या अनुसूचीनुसार, लोकसभेच्या अध्यक्षांना बेशिस्त वर्तनास शिक्षा करण्याचा आणि पक्षांतराच्या आधारावर सदस्यांना अपात्र ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. चर्चित नावांमध्ये आंध्र प्रदेश भाजप अध्यक्ष एनटी रामाराव यांची कन्या दग्गुबती पुरंदेश्वरी यांचेही नाव पुढे आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget