एक्स्प्लोर

2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची शेवटची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक?

8 आणि 9 सप्टेंबरला होणारी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीची शेवटची बैठक असू शकते.

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं दोन दिवसीय अधिवेशन उद्यापासून दिल्लीत सुरु होत आहे. अॅट्रोसिटी कायद्यावरुन सवर्णांमध्ये वाढत चाललेला रोष कसा हाताळायचा, दलित आणि सवर्ण या दोन्हींना कसं सोबत ठेवता येईल, यावर या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला होणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीची शेवटची बैठक असू शकते. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान या राज्यांच्या निवडणुकीसह 2019 च्या रणनीतीवरही यावेळी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला जाऊ शकतो. याशिवाय, या कार्यकारिणीसाठी जे स्थान भाजपने निवडलं आहे, त्यातूनही एक संकेतात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्लीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ही बैठक होणार आहे. मागच्याच वर्षी बाबासाहेबांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या दिमाखादार वास्तूचं पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं होतं. याआधी दिल्लीत जेव्हा भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व्हायची, तेव्हा ती एनडीएमसीच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होत असे, पण यावेळी आंबेडकरांच्या नावाने उभ्या राहिलेल्या या वास्तूत ही बैठक होत आहे. ही बैठक ऑगस्ट महिन्यातच नियोजित होती, मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अॅट्रोसिटी कायद्यावरुन कालच सवर्णांकडून भारत बंदचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय हरियाणात झालेल्या ब्राम्हण संमेलनात काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आवर्जून हजेरी लावून भाजपच्या राज्यात ब्राम्हणांवर कसा अन्याय होतोय याचा पाढा वाचला होता. त्यामुळे दलितांसाठी काही करताना आपला पारंपरिक मतदारही कसा दुखावणार नाही याचं मंथन भाजपमध्ये सुरु झालं आहे. अॅट्रोसिटी कायद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सवर्णांशी संवाद साधण्याची रणनीतीही भाजपने आखली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यादृष्टीने आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे काय मुद्दे समोर येतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. या कार्यकारिणीसाठी उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते दिल्लीत उपस्थित असतील.

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget