एक्स्प्लोर
Advertisement
… तर मी माझं वेतन आणि भत्ते का नाकारु : सुब्रमण्यम स्वामी
भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते स्वीकारणार नसल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी जाहीर केलं. पण भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यापासून फारकत घेतली आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधीवेशनात काँग्रेससह इतर पक्षांनी गोंधळ घातलेल्यामुळे 23 दिवसांचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी 23 दिवसांचं वेतन आणि भत्ते स्वीकारणार नसल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी जाहीर केलं. पण भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी यापासून फारकत घेतली आहे.
“मी रोज संसदेत जातो. जर संसदेचं कामकाज होत नाही, तर ही माझी चूक आहे का? मी राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला प्रतिनिधी आहे. त्यामुळे ते जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत मी माझं वेतन आणि भत्ते का नाकारु?” असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन, वेतन आणि भत्ते नाकारण्याची घोषणा केली. पण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वेतन आणि भत्ते नाकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी काँग्रेसच्या राजकारणामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज झालं नसल्याचा आरोप यावेळी केला. तसेच, काँग्रेसच्या भूमिकेमुळे देशभरातील करदात्यांचा पैसे वाया जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, बुधवारी अन्नाद्रमुकच्या खासदारांनी गोंधळ घातल्याने संसदेचं कामकाज 20 व्या दिवशीही होऊ शकलं नाही. लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर, अन्नाद्रमुकचे खासदार वेलमध्ये येऊन कावेरी पाणीवाटपासंदर्भात बोर्डाची स्थापना केल्यावरुन घोषणाबाजी सुरु केली. यानंतर दुपारी पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. पण तेव्हाही विरोधी पक्षांनी गोंधळ घातल्याने, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. संबंधित बातम्या एनडीएचे खासदार या अधिवेशनातील पगार-भत्ते घेणार नाहीत!I used to go daily, if House didn't run it isn't my fault. Anyhow I'm President's representative, until he says so, how can I say I'll not take my salary: S.Swamy on Ananth Kumar's statement, 'BJP-NDA MPs have decided to not take salaries as Parliament hasn't been functioning' pic.twitter.com/q8sX20knq3
— ANI (@ANI) April 5, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement