एक्स्प्लोर

डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवणाऱ्या सत्यपाल सिंहांना विरोध

परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी 35 वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचं सांगितलं आहे, असा दावा सत्यपाल सिंह यांनी केला.

मुंबई : डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह गोत्यात येण्याची चिन्हं आहेत. डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवणारं भाषण सत्यपाल यांनी मागे घ्यावं, अशी मागणी केली जात असून त्यांच्या विरोधात वैज्ञानिकांनी ऑनलाईन मोहीम सुरु केली आहे. 'डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा आहे. माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकांतून काढून टाकायला हवा', असं वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादमधल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनामध्ये शुक्रवारी केलं होतं. आपण किंवा आपल्या पूर्वजांपैकी कोणीही जंगलात वानरांपासून मानवाची उत्क्रांती होताना पाहिल्याचं लिहून ठेवलेलं किंवा सांगितलेलं नाही. आपण लहानपणी वाचलेल्या पुस्तकात, बालकथेत किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतही याचा उल्लेख नाही, असं सत्यपाल सिंह म्हणाले होते. जेव्हापासून माणूस भूतलावर आला आहे, माणूसच होता आणि माणूसच राहील. परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी 35 वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचं सांगितलं आहे, असाही दावा सिंह यांनी केला. सत्यपाल सिंह यांच्या भाषणाचा तीव्र विरोध करत वैज्ञानिकांनी शनिवारपासून ऑनलाइन मोहीम सुरु केली. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुलं पत्र लिहिण्यात आलं असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. सत्यपाल सिंह यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलं आहे. 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील बागपतमधून भाजपच्या तिकीटावर ते खासदारपदी निवडून आले. 2017 मध्ये त्यांची नियुक्ती राज्यमंत्रिपदी करण्यात आली. सत्यपाल यांनी यापूर्वी केलेल्या काही वक्तव्यांमुळे वादंग माजला होता. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांनी दादरी हत्याकांडाला लहानशी घटना संबोधलं होतं. राईट बंधूंच्या आठ वर्ष आधी शिवकर तळपदे या भारतीयाने पहिल्यांदा विमानाचा शोध लावला, हे भारतीय विद्यार्थ्यांना शिकवायला हवं, असंही सत्यपाल सिंह गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणाले होते. लग्नाच्या मंडपात जीन्स घालून येणाऱ्या तरुणीशी कोणताही मुलगा लग्न करायला तयार होणार नाही, असं वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी गेल्या महिन्यात केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Sonia Gandhi :  राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 
राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Crime: एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
Embed widget