चिक्कबल्लापूर : कर्नाटकमधील चिक्कबल्लापूरचे भाजप खासदार के सुधाकर (K Sudhakar) यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयानिमित्त एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ही पार्टी (Victory Party) एका कारणानं चर्चेत आली आहे. या पार्टीत खुलेआम दारुच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आलं. कार्यकर्त्यांना दारुचं वाटप करण्यासाठी ट्रकमधून दारु आणली गेली होती. दारुच्या बाटल्या मिळाव्यात यासाठी कार्यकर्त्यांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पोलिसांनी या पार्टीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं या पार्टीतील एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये लोक दारु मिळवण्यासाठी शिस्तबद्धलरित्या रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतं.
विशेष बाब म्हणजे खासदार के सुधाकर यांनी पोलिसांना एक पत्र लिहून या पार्टीसाठी सुरक्षा मागितली होती. त्या पत्रात दारु वाटली जाणार असल्याचं देखील म्हटलं होतं. भाजप खासदार के सुधाकर यांच्या पत्रानुसार साडे बारा वाजता ही पार्टी सुरु होईल आणि त्यात जेवण आणि दारुची व्यवस्था करण्यात येणार असल्याचा उल्लेख होता.
बंगळुरु ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सीके बाबा यांनी उत्पादन शुल्क विभागानं या पार्टीला परवानगी दिली होती. पोलिसांना यासाठी सुरक्षा पुरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या प्रकरणामध्ये पोलिसाचा काही दोष नाही, ही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे कारण त्यांनी परवानगी दिली, असं सीके बाबा यांनी म्हटलं. सीके बाबा यांनी आयोजकांना अल्कोहोल म्हणजेच दारुचं वाटप करु नये, नियमांचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा देखील दिला होता. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडे या इंग्रजी वेबसाईटनं दिलं आहे.
पाहा व्हिडीओ :
भाजपच्या के सुधाकर यांनी लोकसभा निवडणुकीत चिक्कबल्लापूर मतदारसंघात काँग्रेसच्या एमएस रक्षा रामैय्या यांना दीड लाख मतांनी पराभूत केलं होतं.
ट्रकमधून दारु आणली, लोकांनी रांगा लावल्या
के. सुधाकर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत ट्रकमधून दारुच्या बाटल्यांचे बॉक्स आणण्यात आले होते. दारुच्या बाटल्या घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. रांगा लावत लोकांनी दारुच्या बाटल्या मिळवल्या. हा सर्व प्रकार सुरु असताना पोलीस देखील तिथं उपस्थित होते.
या पार्टीचे व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार के. सुधाकर यांच्या पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होते. या पार्टीसंदर्भात आरोप प्रत्यारोप राजकारण्यांकडून सुरु झाले आहेत.
संबंधित बातम्या :