Bhole Baba Suraj Pal Property : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) भोले बाबा उर्फ सुरजपाल (Bhole Baba surajpal) यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये 121 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना 2 जुलै रोजी घडली होती. हाथरस घटनेनंतर भोलेबाबा (Bhole Baba) उर्फ सूरज पाल अद्याप फरार असून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नारायण साकार विश्व हरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भोले बाबाची संपत्ती नेमकी किती आहे याबाबतची माहिती पाहुयात.
भोले बाबा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. भोलेबाबाकडे देशभरात 24 भव्य आश्रम आहेत. त्यातील प्रत्येक आश्रम कोट्यवधी रुपये खर्चून बांधला आहे. तसेच अलिशान गाड्यांचा ताफा, सुरक्षेसाठी 5000 जण आहेत. हाथरसमध्ये 2 जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुरज पाल कुठे आहे याचा पत्ता लागलेला नाही. भाले बाबांचे एक-दोन नव्हे तर 24 आश्रम आहेत. तर भोले बाबाचे 100 कोटी रुपयांचे मोठे साम्राज्य आहे.
यूपीसह देशभरात भोलेबाबाचे साम्राज्य
2 जुलैपासून 'भोले बाबा'चे नाव चर्चेत आहे. या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांना जीव गमवावा लागला होता. भोलेबाबा यांनी करोडोंचे साम्राज्य उभे केले आहे. विशेष बाब म्हणजे भक्तांच्या मते भोले बाबा एक रुपयाही दान म्हणून घेत नाहीत. तरीही भक्तांच्या श्रद्धा आणि विश्वासामुळे भोलेबाबा देशभर चर्चेत आहेत. भोलेबाबाने भक्तांकडून कोणतीही देणगी घेतली नसतानाही त्यांनी अतिशय हुशारीने अनेक ट्रस्ट तयार करून त्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली. त्यामुळे बाबांनी देशातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशात राजवाड्यासारखे आश्रमही बांधले.
देणग्या स्वीकारल्या नाहीत, मग एवढी मोठी रक्कम कशी मिळाली?
भोलेबाबांच्या साम्राज्याबद्दल बोलायचे झाले तर तर त्यांची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. यामध्ये मुख्यतः स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. जी बाबांनी निर्माण केलेल्या ट्रस्टद्वारे खरेदी केली आहे. देशभरात सुमारे 24 आश्रम असल्याचे आढळून आले आहे. सूरज पाल सिंह जाटव यांनी 24 मे 2023 रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टच्या नावावर दिली होती. हा ट्रस्ट फक्त भोलेबाबांचे सर्वात विश्वासू सेवक चालवतात. भोलेबाबा चॅरिटीपासून स्वतःला दूर ठेवतात, पण ट्रस्टच्या माध्यमातून अमाप देणग्या जमा होतात. मैनपुरी आश्रमात लावण्यात आलेला बोर्ड पाहिला तर त्यामध्ये सर्व देणगीदारांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये 10,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांचा उल्लेख आहे. या भोलेबाबाने स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याऐवजी स्थानिक लोकांना विश्वस्त बनवले असल्याचे समोर आले आहे.
आश्रमाचा खर्च करोडो रुपये
भक्तांच्या या देणगीतून भोलेबाबांनी आलिशान आलिशान आश्रम बांधले आहेत. त्यातील प्रत्येक आश्रम कोट्यावधींचा आहे. या आश्रमाला थेट भोलेबाबाचे नाव नसले तरी हे राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टने बांधले आहे, कानपूरचा आश्रम हा एखाद्या आलिशान महालापेक्षा कमी नाही. आश्रमातील महागडे झुंबर आणि भोलेबाबाचे राजे सिंहासन पाहण्यासारखे आहे. या आश्रमाप्रमाणे भोलेबाबाचे इतर आश्रमही आलिशान आहेत. कोट्यवधी रुपये किमतीचे हे आश्रम ट्रस्ट चालवतात. पण साहजिकच बाबा इतरांची नावे पुढे करायचे. कानपूरशिवाय मैनपुरी, बिधनू, इटावा, कासगंज आणि नोएडा येथे भोलेबाबाचे राजवाड्यासारखे आश्रम आहेत.
आलिशान वाहनांचा ताफा
भोलेबाबा अंदाजे 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. भोलेबाबा यांनी गुलाबी सैन्याची स्थापना केली आहे. ज्यात किमान 5000 सैनिक आहेत. विशेष म्हणजे ही पिंक आर्मी बाबांच्या प्रत्येक सत्संगात सुरक्षेचे तीन स्तर तयार करत असे. सुमारे 5000 गुलाबी सैनिकांच्या या सैन्यात भोलबाबाचे वैयक्तिक 100 ब्लॅक कॅट कमांडो देखील सामील होते. भोलेबाबाच्या सुरक्षा वर्तुळात 25 ते 30 जणांचे विशेष हरिवाहक पथकही होते. भोलेबाबाचे सुरक्षा कवच मोठे तर होतेच, पण त्यांच्या वाहनांचा ताफाही चर्चेचा विषय बनला होता. या ताफ्यात अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. या ताफ्यात प्रत्येक वेळी 25 ते 30 वाहने असायची, त्यापैकी भोलेबाबा स्वत: फॉर्च्युनर कार चालवत असत.
महत्वाच्या बातम्या: