Rahul Gandhi: परदेश दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडीओ भाजपकडून व्हायरल
Rahul Gandhi : नेपाळ दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाइट क्लबमधील व्हिडिओ भाजप नेत्यांनी व्हायरल केला आहे.
Rahul Gandhi : परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नाईट क्लबमधील व्हिडिओ भाजप नेत्यांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाइट क्लबमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओनंतर युजर्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप समर्थकांकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. तर, खासगी आयुष्यात इतरांनी दखल देण्याचे कारण काय असा सवालही युजर्सकडून उपस्थित करण्यात येत आहे.
राहुल गांधी हे आपल्या एका मैत्रिणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी यांची मैत्रिण सुमनिमा उदास ही एका आंतरराष्ट्रीय वृ्त्तसंस्थेत पत्रकार म्हणून कार्यरत होती. सुमानिमाच्या वडिलांनी नेपाळचे राजदूत म्हणून म्यानमारमध्ये जबाबदारी पार पाडली. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती या विवाह सोहळ्यात दाखल होणार आहेत.
राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपशी संबंधित राजकीय नेते, उजव्या विचारसरणीला पाठिंबा असणाऱ्या युजर्सकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi was at a nightclub when Mumbai was under seize. He is at a nightclub at a time when his party is exploding. He is consistent.
— Amit Malviya (@amitmalviya) May 3, 2022
Interestingly, soon after the Congress refused to outsource their presidency, hit jobs have begun on their Prime Ministerial candidate... pic.twitter.com/dW9t07YkzC
राहुल गांधी यांनी विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्यास गैर काय असा सवाल काही युर्जसने केला आहे.
What is wrong in it when he attends a marriage reception? Why Sanghi’s are afraid about him ? Why Sanghi’s are spreading lies ? Everyone of us attend private functions.
— Manickam Tagore .B🇮🇳✋மாணிக்கம் தாகூர்.ப (@manickamtagore) May 3, 2022
तर, काही युजर्सने पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी चित्रीकरणात व्यस्त होते असा दावा करणारे ट्वीट केले आहे.
PM was shooting when pulwama happened....
— A.J. (@beingabhi2712) May 3, 2022
PM is njoying in Germany when country is going thru its worst economic n social harmony crisis...
He is consistent pic.twitter.com/HLI0thu34m
एखाद्या नेत्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचा सूरही उमटत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी होण्याची शक्यता आहे.