एक्स्प्लोर

शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील : संजय राऊत

संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपने आम्हाला धोका दिला. तसंच भाजपने शिवसेनेच्या रुपाने चांगला मित्रपक्ष गमावल्याचा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

नवी दिल्ली : "राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्त्वात सरकार येईल," असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी महाराष्ट्रात स्थिर येईल, असा विश्वास व्यक्त केला. तर शरद पवार यांनी काल (18 नोव्हेंबर) दिल्लीत टाकलेल्या गुगलीवर विचारलं असता पवार समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील, असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. भाजपने आम्हाला धोका दिला. तसंच भाजपने शिवसेनेच्या रुपाने चांगला मित्रपक्ष गमावल्याचा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. शिवसेनेच्या नेतृत्त्वात कार्यक्षम सरकार बनेल शिवसेनाच राज्यात सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वात मजबूत, स्थिर आणि आतापर्यंतचं कार्यक्षम सरकार बनेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसंच सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नसून फक्त माध्यमांच्या मनात हा गोंधळ असल्याचंही त्यांनी सांगितलं. पवारांना समजायला 100 जन्म लागतील शरद पवार यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगत गुगली टाकली. त्यांच्या या वक्तव्या शिवसेना चांगली बुचकळ्यात पडली. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार अशीही चर्चा रंगली. याविषयी संजय राऊत म्हणाले की, "मला शरद पवारांवर अजिबात शंका नाही, डिसेंबरआधी आम्ही सरकार स्थापन करु. पुढे ते म्हणाले की, "भाजपच्या मुंबईतील नेत्याने मध्यंतरी वक्तव्य केलं होतं की नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला संजय राऊतांना 25 जन्म लागतील. तसंच मी या देशातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, माननीय शरद पवार यांना समजून घ्यायला 100 जन्म लागतील." काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची आजची बैठक रद्द काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील आजची बैठक टळली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज होणारी बैठक आता उद्या होणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत असा निर्णय झाला होता की, दोन्ही पक्षांचे नेते पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा करतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special ReportSupriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special ReportRajkiya Shole on Saif ali Khan| सैफ अली खानवर हल्ला, विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget