BJP Brigade Rally | अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश; ब्रिगेड मैदानावर फडकावला पक्षाचा झेंडा
BJP Brigade Rally : बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. तर बंगाल निवडणूकींचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अशातच मिथुन चक्रवर्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
BJP Brigade Rally : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकातामधील ब्रिगेड मैदानातून बंगालमधील जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान सभास्थळी पोहचण्यापूर्वी एक तास अगोदरच मिथुन चक्रवर्ती मंचावर दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी 16 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
भाजपसाठी प्रचार करणार मिथुन चक्रवर्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता रॅलीमध्ये मंचावर मिथुन चक्रवर्ती उपस्थित होते. यावरुन ते बंगाल निवडणुकींमध्ये भाजपसाठी प्रचार करणार असल्याचं निश्चित झालं आहे. मिथुन चक्रवर्ती यांची ही राजकारणातील दुसरी इनिंग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल कांग्रेसकडून 2014 मध्ये राज्यसभेची खासदारकी देण्यात आली होती.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मतदान 27 मार्चपासून सुरु होणार आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी दावा केला आहे की, निवडणूक रॅलीमध्ये जवळपास 10 लाख लोक सहभागी होतील.
आठ टप्प्यांमध्ये पार पडणार बंगला निवडणूका :
बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. 27 मार्च रोजी बंगलामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 1 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यांत 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 6 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून 31 जागांसाठी मतदान केलं जाणार आहे.10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पाचवा टप्पा 17 एप्रिल रोजी पार पडणार असून येथे 45 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. याव्यतिरिक्त 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात 41 जागांसाठी, तर 26 एप्रिल रोजी सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी आणि आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बंगाल निवडणूकींचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Janaushadhi divas | जेनेरिक औषधांमुळे गरीबांना स्वस्त औषधे आणि युवकांना रोजगार मिळाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- International Women’s Day 2021 | जागतिक स्तरावर महिला खासदारांचे प्रमाण आतापर्यंत सर्वाधिक; Inter-Parliamentary Union चा अहवाल
- West Bengal | सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, पंतप्रधानांच्या रॅलीतही नसणार