एक्स्प्लोर

Nitish Kumar : प्रशांत किशोर यांच्या भुमिकेशी माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री नितीश कुमारांची प्रतिक्रिया

प्रशांत किशोर यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याचे संकेत दिले आहे. यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नितीश कुमार यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला.

Nitish Kumar : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. ते लवकरच राजकारणात सक्रिय सहभागी होणार आहेत. यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)  यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नितीश कुमार यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. प्रशांत किशोर यांच्या भुमिकेशी आपला काहीही संबंध नसल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या नात्याची नेहमीच चर्चा 

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात असमाऱ्या नात्याची नेहमीच बिहारमध्ये चर्चा होत असते. जेडीयूने प्रशांत किशोर यांना राजकीय व्यासपीठही दिले होते. मात्र, त्यानंतर प्रशांत आणि नितीश यांच्यातील राजकीय संबंध बिघडले आणि दोघेही वेगळे झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही जोडी दिल्लीत एकत्र दिसली होती. प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांनी दिल्लीत एकत्र डिनर केला होता. त्यावेळी नितीश कुमार म्हणाले होते की, प्रशांत किशोर यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत, राजकीय नाहीत.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. कारण त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत अनेकदा बैठका घेतल्या होत्या. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची योजनाही त्यांनी सांगितली होती. तेव्हा ते स्वत: पक्षात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा होती. मात्र काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने त्यांनी पक्षात येण्यास नकार दिला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट केले होते. त्याची जोरदार चर्चा झाली. आता जनतेसमोर जाण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात बिहारपासून होईल असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. मात्र, त्यांनी पक्ष कधी काढणार, त्यांच्या पक्षाचे नाव काय असेल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, सुरुवात  बिहारमधून करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बिहारमधूनच नवीन 'जन सूरज' मोहीम सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
जोपर्यंत भारतात सनातनची शक्ती, तोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्याचा राहुल गांधींना इशारा 
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget