पाटणा : बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू यांचं गठबंधन असलेलं सरकार बनणार आहे. या निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधन यांच्या कांटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, महागठबंधन बहुमत मिळवू शकलं नाही. निवडणुकीतील पराभवानंतर आज लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी मंथन बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी महागठबंधनमधील सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.


महागठबंधनाच्या आमदारांची आज बैठक


महागठबंधनच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. ज्यामध्ये काँग्रेस आणि वामदलांचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होणार आहेत. बैठक सकाळी 11 वाजता राबडी देवी यांच्या निवासस्थानी होणार आहे. बैठकीनंतर महागठबंधनाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते.


जेडीयू आमदारांचीही बैठक आजच होण्याची शक्यता


जेडीयूच्या आमदारांचीही बैठक आज होण्याची शक्यता आहे. याआधी काल बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांनी निवडणुकीच्या निकालांनंतर एनडीएला मिळालेल्या विजयासाठी सर्वांचे आभार मानले. बिहार निवडणूकीत एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. यासाठी जनतेचे आभार प्रकट करत नीतीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.


त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, "जनता मालक आहे. त्यांनी एनडीएला जे बहुमत दिलं, त्यासाठी जनता-जनार्दनला माझा प्रणाम. मी पंतप्रधान मोदींचे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्यासाठी आभार मानतो."


नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी


बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही सर्व नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएनच्या कार्यकर्ता आणि बिहारमधील जनतेसोबत विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असं म्हणत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.


निवडणुकीसाठी मतदान पार पडलं की पूर्वी हिंसाचाराच्या, मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याच्या, मतपेट्या पळवून नेल्याच्या बातम्या यायच्या. मात्र आता शांततेत मतदान झाल्याच्या, मतदान वाढल्याच्या बातम्या येतात. ही अतिशय सकारात्मक बाब असल्याचं मोदी म्हणाले. याबद्दल त्यांनी देशवासीयांचे आभार मानले.


पाहा व्हिडीओ : नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करू : पंतप्रधान नरेंद्र मोदी



बिहारमध्ये 'NOTA' ने बदलले सत्तेचे समीकरण, अनेक उमेदवार थोडक्यात पराभूत


नुकत्याच पार पाडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल सात लाख मतदारांनी 'नोटा' चा पर्याय निवडला अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. बिहार निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएला कौल दिला आहे. सत्तारुढ एनडीएने 243 सदस्यीय विधानसभेत 125 जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे तर विरोधी पक्ष महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला आहे. नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 7 लाख 6 हजार 252 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. ही संख्या एकूण झालेल्या मतदानाच्या 1.7 टक्के इतकी आहे. ही मते कोणत्याही उमेदवाराच्या पारड्यात पडली नाहीत. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत चार कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही संख्या एकूण मतदारांच्या 57.07 इतकी आहे.


महत्त्वाच्या बातम्या :