एक्स्प्लोर

Tejashwi Yadav : बिहारमध्ये तेजस्वी यादवांचा काँग्रेसला ठेंगा? RJD जास्तीत जास्त जागा लढवणार, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पदही न मिळण्याची शक्यता

Bihar Assembly Elections 2025 : बिहारमध्ये जर महागठबंधनचे सरकार आलेच तर VIP पक्षाला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचा दावा मुकेश सहानी यांनी केला आहे.

Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनमध्ये (Mahagathbandhan) जागा वाटपावरुन तणाव वाढल्याचं चित्र आहे. राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी जास्तीत जास्त जागा लढवण्याची तयारी सुरू केली असून त्यामुळे काँग्रेसला अपेक्षित जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातंय. तसेच महागठबंधन जर सत्तेत आले तरीही काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यताही नसल्याची चर्चा सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत, 2020 मध्ये काँग्रेसने 70 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण यावेळी केवळ 50 ते 55 जागा (seats) मिळण्याची शक्यता आहे. तर आरजेडी (RJD) 125 ते 130 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.

Vikassheel Insaan Party Bihar : व्हीआयपी पक्षाला मिळणार जास्त जागा

दुसरीकडे महागठबंधनमधील घटक पक्ष असलेल्या विकसनशील इंसान पक्षाला (Vikassheel Insaan Party) जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डाव्या पक्षांना (Left Parties) 30 ते 35 जागा, व्हीआयपीला (VIP) 18 ते 20 जागा, आरएलजेपी (RLJP) ला 3 ते 4 आणि जेएमएम (JMM) ला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. जर व्हीआयपीला 20 जागा मिळाल्या, तर ते या समीकरणात मोठे लाभार्थी ठरतील.

Bihar Congress Seat Sharing Formula : काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

काँग्रेसने जागा मागण्यासाठी एक नवा सीट फॉर्म्युला (seat formula) तयार केला आहे:

A कॅटेगरी ज्या जागांवर काँग्रेस मागील निवडणुकीत 5 ते 10 हजार मतांनी पराभूत झाली.

B कॅटेगरी 10 ते 15 हजार मतांच्या फरकाने हरलेल्या जागा.

C कॅटेगरी 15 ते 20 हजार मतांनी हरलेल्या जागा.

या आधारावर काँग्रेस 70 ते 75 जागांवर (seats claim) दाव करत आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार, आरजेडी काँग्रेसला 48 पेक्षा जास्त जागा देण्याच्या मूडमध्ये नाही. तरीही काँग्रेसला आशा आहे की त्यांना किमान 55 जागा मिळतील.

RJD Bihar Politics : आरजेडीमध्येही वाढती नाराजी

आरजेडीमध्येही काही जागांबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, या वेळी 2 ते 3 विद्यमान आमदारांचे (MLAs) तिकीट कापले जाऊ शकते. दुसरीकडे, व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहनी (Mukesh Sahani) यांनी दावा केला आहे की, महागठबंधनातील जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे आणि सरकार आल्यास ते उपमुख्यमंत्री (Deputy CM) होतील.

काँग्रेससाठी ह आणखी एक धक्का मानला जातोय. मात्र, दोन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला तर त्याचा फायदा काँग्रेसलाही (Congress Deputy CM post) होऊ शकत. पुढील एक-दोन दिवसांत जागा वाटपावर अंतिम निर्णय घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे.

Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल

एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243

राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79

भारतीय जनता पक्ष (BJP) – 78

जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45

काँग्रेस (Congress) – 19

CPI (Marxist–Leninist) Liberation – 12

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4

CPI – 2

CPI (M) – 2

AIMIM – 1

स्वतंत्र आमदार (Independent MLA) – 1

एकूण NDA गट (NDA Alliance Total) सुमारे 123 ते 127

महागठबंधन (Mahagathbandhan) एकूण सुमारे 110 ते 115

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
Embed widget