एक्स्प्लोर
गोवा मंत्रिमंडळात मोठे बदल अपेक्षित, अनेकांना अर्धचंद्र, बाबू कवळेकर नवे उपमुख्यमंत्री?
भाजपने गोव्यात काँगेसला मोठे भगदाड पडल्याने काँग्रेसची फार दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाचे विरोधी पक्षनेते पद सुद्धा गेले. पक्षाकडे आता केवळ पाच आमदार राहिले आहेत.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंत्रिमंडळात फार मोठे बदल घडवण्याच्या तयारीत आहेत. सध्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हटवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या विजय सरदेसाई आणि बाबू आजगावकर हे उपमुख्यमंत्री आहेत. गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येईल. बाबू आजगावकर यांचे उपमुख्यमंत्रीपद काढून घेतले जाईल मात्र ते मंत्री राहतील. बाबू कवळेकर यांना आता नवे उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे.
उपसभापती मायकल लोबो यांची यावेळी मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. बाबुश मोन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना देखील मंत्रिपदे मिळतील असा अंदाज आहे. बहुतेक सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फार मोठे बदल होतील, असा अंदाज आहे.
आज अमित शाह, पंतप्रधानांना भेटणार!
रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीकडे प्रयाण केले. आज हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत.
मंत्रिमंडळाची पुनर्रचना उद्या!
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना उद्या शुक्रवारी करण्याची शक्यता आहे. त्यानुसार अपक्ष आणि गोवा फॉरवर्डच्या सर्व मंत्र्यांना वगळण्याची दाट शक्यता आहे. राज्यपाल मृदूला सिन्हा रात्री उशिरा तथा पहाटे गोव्यात पोहोचतील अशी माहिती काल सूत्रांनी दिली आहे. आज नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन सायंकाळी उशिरा ही सर्व मंडळी गोव्यात पोहोचणार आणि त्यानंतर रात्री उशिरा शपथविधी होऊन शुक्रवारी मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाणार आहे.
विधानसभेतील ताज बलाबल
भाजप 27
काँग्रेस 05
अपक्ष 03
मगो 01
गोवा फॉरवर्ड 03
राष्ट्रवादी काँग्रेस 01
गोवा फॉरवर्ड, अपक्ष सरकारचा पाठिंबा काढणार?
दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे नाराज झालेल्या गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत विचार चालवला आहे. पुढील दोन दिवसांत डॉ. प्रमोद सावंत कोणता निर्णय घेतात यावर गोवा फॉरवर्ड निर्णय घेईल. त्याचबरोबर तिन्ही अपक्षांचे महत्त्व शून्यावर आल्याने ते देखील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे.
भाजपने गोव्यात काँगेसला मोठे भगदाड पडल्याने काँग्रेसची फार दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाचे विरोधी पक्षनेते पद सुद्धा गेले. पक्षाकडे आता केवळ पाच आमदार राहिले आहेत. किमान 10 आमदार असले तरच विरोधी पक्षनेते पद मिळते. आता ते पदही या पक्षाला देता येणार नाही.
अधिवेशन 15 जुलैपासून
विधानसभेचे अधिवेशन 15 जुलैपासून सोमवारी सुरु होत आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळात मोठे बदल होतील. तथापि, मंगळवारी काँग्रेस विधीमंडळ गटाची बैठक घेऊन त्यात भाजप आघाडी सरकारातील भ्रष्टाचाराची प्रकरणे व इतर काही प्रकरणे घेऊन विधानसभेत सरकारला धारेवर धरले जाईल अशी घोषणा करणाऱ्या बाबू कवळेकर यांच्या भूमिकेत आता अचानक बदल झाला. रवी नाईक यांनी 2000 मध्ये काँग्रेस विधीमंडळ नेता तथा विरोधी पक्षनेता असताना काँग्रेसमधून आठ आमदारांना फोडून आणून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबू कवळेकर हे दुसरे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. यांनी तर आपल्याबरोबर चक्क नऊ आमदार घेऊन भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
