एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर कन्येकडून अंत्यसंस्कार
भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला. भय्यू महाराज यांनी काल (12 जून रोजी) इंदूरमधल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.
सकाळी नऊ वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यसंस्कारापूर्वी सजवलेल्या रथातून भय्यूजी महाराज यांची अंत्ययात्रा सूर्योदय आश्रमातून मुक्तीधाम स्मशानभूमीच्या दिशेनं निघाली. आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते.
भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. दरम्यान ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.
भय्यू महाराज यांची आत्महत्या
आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी 12 जून रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भय्यू महाराजांची सुसाईड नोट
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
कुणीतरी कुटुंबाची काळजी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप खचलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
कोण होते भय्यू महाराज?
भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता.
भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.
भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!
इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.
शेवटचं ट्विट
भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची बातमी दुपारी अडीचच्या सुमारास आली. मात्र ही बातमी येण्यापूर्वीच त्यांनी काही ट्विटही केले होते. त्यांच्या @bhaiyujimaharaj या ट्विटर हॅण्डलवरुन दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी शेवटचं ट्विट करण्यात आलं आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी मासिक शिवरात्री अर्थात महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
या ट्विटसोबत भय्यू महाराज यांनी संस्कृत वचन असलेला महादेवाचा फोटो ट्विट केला आहे. या संस्कृत वचनाचा अर्थ खूपच गंभीर आहे.
"जन्म, मृत्यू, वार्धक्य यांनी पीडित असणारा, तसेच कर्म बंधनात अडकलेल्या मला, हे मृत्युंजय महादेवा, मला वाचव. मी तुला शरण आलो आहे", हे संस्कृत वचन असलेले फोटो ट्विट भय्यू महाराज यांनी केलं.
संबंधित बातम्या
भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं
मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि भय्यू महाराजांनी गोळी झाडली!
भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!
हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट
नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement