एक्स्प्लोर
Advertisement
बँक डिटेल्ससाठी बनावट कॉल, कोणालाही माहिती देऊ नका!
सध्या केवायसीच्या नावाखाली स्पॅम कॉल्स येण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे स्पॅमर्स तुम्हाला बँकेतून कॉल केल्याचं भासवतात. तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेसाठी तुमचं नाव, एटीएम कार्ड नंबर, सीव्हीव्ही, आणि ओटीपी मागतात.
मुंबई : आजकाल ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचं प्रमाण वाढलं आहे. मात्र यासोबतच ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाणही वाढताना दिसत आहे.
अनेकदा तुम्हाला अनोळखी नंबरवरुन केवायसीसाठी आधार कार्डचा नंबर, पॅन कार्ड नंबर आणि एटीएमचा पीन मागणारा फोन येत असेल. मात्र कोणतीही बँक तुम्हाला अशा प्रकारचा फोन करत नाही.
सध्या केवायसीच्या नावाखाली स्पॅम कॉल्स येण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे स्पॅमर्स तुम्हाला बँकेतून कॉल केल्याचं भासवतात. तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेसाठी तुमचं नाव, एटीएम कार्ड नंबर, सीव्हीव्ही, आणि ओटीपी मागतात. ते न दिल्यास तुमचं अकाऊंट बंद केलं जाईल असा इशाराही देतात.
अनेकदा अशा कॉल्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. मात्र कोणतीही बँक तुम्हाला केवायसीसाठी कॉल किंवा मेसेज करत नाही. फसवणुकीचे प्रकार वाढल्यानंतर बँकांनीही ग्राहकांना कुणालाही आपली गोपनीय माहिती न देण्याबद्दल मेसेज पाठवून आवाहनही केलं आहे.
मात्र तरीही तुम्हाला असे कॉल्स येत असतील तर तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे बँकेकडून फोन करत असल्याची बतावणी कुणी करत असेल तर त्याच्या भूलथापांना बळी न पडता आपली आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका. तसंच तुमचे कोणतेही नंबर कुणालाही सांगू नका.
ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?
- कुणालाही, अगदी विश्वासातील व्यक्तीलाही तुमच्या एटीएम किंवा बँकेचे डिटेल्स देऊ नका.
- बँक कुणालाही व्हेरिफिकेशन किंवा केवायसीसाठी कॉल करत नाही.
- नेट कॅफेतून तुमचं नेट बँकिंग वापरु नका.
- एटीएममध्ये पैसे काढताना तुमचा पीन कुणी पाहात नाही याची खात्री करा.
- ऑनलाईन वॉलेट्सचा वापर करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही याची पडताळणी करा.
- पासवर्ड कुठेही सेव्ह करु नका.
- बँकेकडून पाठवला जाणारा ओटीपी कुणाशीही शेअर करु नका.
- तुमचं एटीएम कार्ड हरवलं असल्यास तातडीने ते ब्लॉक करा.
- ट्रु कॉलर नावाच्या अपवर तुम्ही ब्लॉक स्पॅमर्स हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला असे कॉल्स येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement