एक्स्प्लोर
वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला!
![वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला! Bengaluru Traffic Police Cop Stops Presidents Convoy To Make Way For Ambulance वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/20134344/ML_Nijalingappa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : बंगळुरुच्या त्रिनिटी मंडळात तैनात एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफा रोखला. अॅम्ब्युलन्सला रस्ता देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं.
वाहतूक पोलिस उपनिरीक्षक एमएल निजलिंगप्पा यांच्या या साहसी कृत्यामुळे त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांचा सन्मान केला.
त्रिनिटी क्षेत्रात मेट्रो ग्रीन लाईनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बंगळुरुमध्ये होते.
राष्ट्रपतींचा ताफा राजभवनच्या दिशेने जात असल्याने वाहतूक रोखण्यात आली होती. पण या ट्रॅफिकमध्ये एक अॅम्ब्युलन्सही अडकली होती. त्यावेळी घटनस्थळी तैनात असलेले वाहतूक पोलिस उप निरीक्षक एमएल निजलिंगप्पा यांनी प्रसंगावधान दाखवून राष्ट्रपतींचा ताफा रोखला आणि अॅम्ब्युलन्सला वाट दिली.
ट्रॅफिक पोलिसाच्या या कृत्यामुळे बंगळुरुच्या वाहतूक पोलिस पूर्व विभागाचे उपायुक्त अभय गोयल यांनी ट्वीट करुन त्यांचं अभिनंदन केलं.
https://twitter.com/DCPTrEastBCP/status/876330897443704833
तर पोलिस आयुक्त प्रवीण सूद यांनीही एमएल निजलिंगप्पा यांचं कौतुक केलं.
https://twitter.com/CPBlr/status/876307506670092288
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
भारत
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)