Bengaluru Stampede : बंगळुरूचे पोलिस आयुक्त, ACP-DCP अन् हवालदारपर्यंत सगळेच निलंबित, RCB विरोधात गुन्हा, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Bengaluru Chinnaswamy Stadium Stampede Case : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासह या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : बंगळुरू चेंगराचेंगरीसंबंधी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरू शहराच्या पोलिस आयुक्तांना त्यांनी निलंबित केलं आहे. तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त, एसीपी, डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकालाही निलंबित केलं आहे. त्याचसोबत आरसीबी संघ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 वर्षांनंतर आयपीएल जिंकल्यानंतर बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्टेडिअमच्या बाहेर मोठी गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामध्ये 11 जणांचा बळी गेला तर 50 हून अधिक लोक जखमी झाले. यानंतर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई केली आहे.
Bengaluru stampede | Karnataka CM Siddaramaiah says, "Cubbon Park Police Station Police Inspector, Station House Master, Station House Officer, ACP, Central Division DCP, Cricket Stadium in-charge, Additional Commissioner of Police, Commisioner of Police have been suspended with… pic.twitter.com/3U9YS8CLhm
— ANI (@ANI) June 5, 2025
Bengaluru Police Commissioner Suspended : बंगळुरूचे पोलिस कमिशनर निलंबित
बंगळुरू चेंगराचेंगरी संबंधी करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, "कबन पार्क पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, स्टेशन हाऊस मास्टर, स्टेशन हाऊस ऑफिसर, एसीपी, सेंट्रल डिव्हिजन डीसीपी, क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस आयुक्त यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे."
Bengaluru stampede | FIR filed against RCB, DNA (event manager), KSCA Administrative Committee and others at Cubbon Park Police Station. FIR stated criminal negligence in the stampede incident. Sections 105, 125 (1)(2), 132, 121/1, 190 R/w 3 (5) have been invoked in the FIR.
— ANI (@ANI) June 5, 2025
FIR Against RCB : आरसीबी विरोधात गुन्हा दाखल
कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी), केएससीए प्रशासकीय समिती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 105, 125 (1) (2), 132, 121/1, 190 R/w 3 (5) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bengaluru Chinnaswamy Stadium Stampede : चौकशीसाठी समिती नेमली
बंगळुरू चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल डी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीला 30 दिवसांच्या आत आपला अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या घटनेला जे कुणी कारणीभूत असतील त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी दिली.
ही बातमी वाचा:























