एक्स्प्लोर
Advertisement
सात वर्षांच्या मुलीला गच्चीवरुन फेकून मारलं, जन्मदात्रीला बेड्या
स्वातीने श्रेयाला चारमजली इमारतीच्या गच्चीवर नेलं आणि जोरात खाली फेकलं. त्यानंतर ती धावत खाली गेली आणि जमिनीवर पडलेल्या लेकीला उचलून पुन्हा वर घेऊन निघाली.
बंगळुरु : बंगळुरुतील महिलेने इमारतीच्या गच्चीवरुन पोटच्या मुलीला खाली फेकत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याचं प्राथमिक तपासणीत म्हटलं जात आहे.
आरोपी स्वाती सरकारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वातीने सात वर्षांच्या मुलीला चार मजली इमारतीच्या गच्चीवरुन दोन वेळा खाली टाकल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. दक्षिण बंगळुरुतील जेपीनगरमधल्या जरगनहल्लीमध्ये रविवारी दुपारी हा प्रकार घडला. यामध्ये सात वर्षीय श्रेया उर्फ ऐशिका सरकारचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पळ काढणाऱ्या महिलेला स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने विजेच्या खांबाला बांधून ठेवलं.
सरकार कुटुंब हे मूळ पश्चिम बंगालचं आहे. आरोपी स्वाती ही शाळेत शिक्षिका होती. स्वातीचे विभक्त पती कांचन सरकार हे वरिष्ठ बिझनेस विश्लेषक आहेत. दक्षिण बंगळुरुतील जेपीनगरमधल्या जरगनहल्ली परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मायलेकी राहायच्या. सात वर्षांची नुकतीच श्रेया अडखळत बोलायला लागली होती.
स्वाती अनेक वेळा रागाच्या भरात स्वतःवरचा ताबा हरवून बसायची आणि मुलीला मारहाण करायची, अशी माहिती कांचन यांनी पोलिसांनी दिली.
घटनेच्या दिवशी काय झालं?
स्वातीने श्रेयाला चारमजली इमारतीच्या गच्चीवर नेलं आणि जोरात खाली फेकलं. त्यानंतर ती धावत खाली गेली आणि जमिनीवर पडलेल्या लेकीला उचलून पुन्हा वर घेऊन निघाली. इमारतीतील काही रहिवाशांनी रक्तबंबाळ श्रेयाला कडेवर उचलून वर जाणाऱ्या स्वातीला पाहिलं. घाबरुन त्यांनी स्वातीकडे चौकशी केली असता ती रहिवाशांवरच डाफरली. स्वतःच्या कामाकडे लक्ष देण्याचा सल्ला तिने इतरांना दिला.
गच्चीवर गेल्यानंतर स्वातीने पुन्हा श्रेयाला जमिनीवर फेकलं. त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न
करणाऱ्या स्वातीला स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने विजेच्या खांबाला बांधून ठेवलं. पोलिसांनी स्वातीला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. माझ्या मुलीसोबत मी काय करावं, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे, असं उत्तर तिने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement