फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
Belgaum : धावत्या रेल्वेत तिकीट तपासण्यास आलेल्या टीसीसह दोघांवर फुकट्या रेल्वे प्रवाशाने चाकू हल्ला केलाय. तिकीट नसलेल्या प्रवाशाने टीसीसह दोघांवर चाकू हल्ला करून जखमी केले.
Belgaum : धावत्या रेल्वेत तिकीट तपासण्यास आलेल्या टीसीसह दोघांवर फुकट्या रेल्वे प्रवाशाने चाकू हल्ला केलाय. तिकीट नसलेल्या प्रवाशाने टीसीसह दोघांवर चाकू हल्ला करून जखमी केले. तर अन्य एका कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याच्या छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली. लोंढा ते गुंजी दरम्यान धावत्या रेल्वेत हा प्रकार घडलाय. देवर्षी असे चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो झांशी येथील राहिवासी आहे. तिकीट तपासनीस अश्रफ कित्तुर आणि कंत्राटी रेल्वे कर्मचारी शोएब शेख यांच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
मला विचारतोस काय म्हणत प्रवाशाचा चाकूहल्ला
अधिकची माहिती अशी की, पाँडिचेरी हून दादर येथे निघालेल्या चालुक्य एक्सप्रेस रेल्वेत तिकीट तपासनीस अश्रफ कित्तुर हे नेहमी प्रमाणे प्रवाशांची तिकिटे तपासत होते. त्यावेळी सात-आठ प्रवाशांच्या पैकी चार जणांकडे तिकीट नव्हते. म्हणून तिकीट तपासनिसाने त्यांना दंड ठोठावला. त्यानंतर दरवाजाकडे उभारलेल्या एका प्रवाशाकडे त्यांनी तिकीटाची विचारणा केली. त्यावेळी मला विचारतोस काय म्हणून त्या प्रवाशाने चाकू काढून वार करण्याचा प्रयत्न केला.
टीसीसह आणखी दोघांवर प्रवाशाचा हल्ला
यावेळी तिकीट तपासनीस प्रसंगावधान राखून बाजूला सरकले, पण त्यांच्या हातावर वार बसला. कंत्राटी कर्मचारी देवर्षी तेथे जवळ थांबला होता. तो तिकीट तपासनिसाचा माणूस आहे, असे समजून प्रवाशाने त्याच्या छातीत चाकू भोसकला. त्यामुळे देवर्षी रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि जागीच गतप्राण झाला. हल्लेखोर प्रवाशाने रेल्वेतून उडी टाकून पलायन केले. पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस करून माहिती घेतली. या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या