एक्स्प्लोर

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण रेषेवर गुरुवारी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद झाले. या हल्ल्यात बॅट हल्लेखोरांनी भारतीय सैनिकांना खेचून घेण्यासाठी जाळं आणि चाकू वापरल्याची माहिती पुढे येत आहे. तसंच यावेळी या हल्ल्याचं पाकिस्तानी सैनिकांकडून व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या बॅट जवानांच्या तुकडीने परवा भारतीय हद्दीत घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात, दोन भारतीय जवान शहीद झाले, तर भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात बॅट तुकडीचा एक सैनिक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ठार झालेल्या बॅट जवानाची पाहणी केल्यावर त्याच्या डोक्याला व्हिडिओ कॅमेरा आणि जवळ माणसांना खेचायचा सापळा असल्याचं स्पष्ट झालं. कंठस्नान घातलेल्या घुसखोराचा मृतदेह भारतीय लष्कराने ताब्यात घेतला असून, त्याच्याकडून खंजीर, चाकू, एके रायफल्स, 3 मॅगेझिन, 2 ग्रॅनेड, अशी शस्त्रे मिळाली. तसंच त्यासोबत एक हेडबँड कॅमेरा मिळाल्याचंही त्या अधिकाऱ्याने यावेळी सांगितलं. भारताकडून सातत्यानं मात खाणाऱ्या पाकिस्तानने भ्याड हल्ले करण्याचं सत्र सुरु केलं आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने भारतीय जवानांना खेचण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारचं जाळं तयार केलं असून, त्याद्वारे ते भारतीय जवानांना खेचून त्यांची हत्या करत आहेत. यानंतर ते भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. या बॅट टीममध्ये केवळ पाकिस्तानच्या लष्करी जवानांचाच समावेश असतो असे नव्हे, तर काही दहशतवाद्यांचाही समावेश असतो. या दहशतवाद्यांना लष्करी तळावर हल्ला करण्यासाठीच खास प्रशिक्षण दिलं जातं, असंही या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं. वास्तविक, कोणत्याही देशाचा जवान सीमेचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्यास, त्याचा शत्रू सैन्यातील जवान मान राखत त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. पण पाकिस्तानच्या बॅट टीमनं सातत्यानं मानवी सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्याचं बॅटच्या हल्ल्यातून समोर येत आहे. कारण बॅट टीमच्या हल्ल्यात शत्रू सैन्याच्या जवानाची हत्या केल्यानंतर, त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात समोर आल्यात आहेत. यामध्ये 1 मे रोजी पुंछ जिल्ह्यातल्या हल्ल्याचा समावेश आहे. या हल्ल्यातही दोन भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच बॅटच्या घुसखोरांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. तर 2013 मध्ये शहीद जवान हेमराज यांचीही अशाच प्रकारे बॅट हल्लेखोरांनी हत्या करुन, त्याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारचा हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण बॅट टीमचा हा कट भारतीय जवानांनी उधळून लावल्याची माहिती अधिकाऱ्याने पीटीआयला दिली. दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. भारतीय जवानाचं शीर कापून नेण्याचे प्रकार ही उजेडात आले आहेत. त्यामागे पाकिस्तानी लष्कराची बॉर्डर अक्शन टीम असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पाकिस्तानच्या या कृत्याने भारतीय जनमानसात संतापाची लाट आहे. संबंधित बातम्या पाक लष्कराच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget