Bank Holiday Today : आज 'या' शहरात बँका राहणार बंद, बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँकांना सुट्टी
आज देशातील अनेक राज्यात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद आहेत.
Bank Holiday Today : आज बुद्ध पौर्णिमा आहे. संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची जयंती आहे. त्यानिमित्त आज देशातील अनेक राज्यात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असलेल्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये बँका बंद राहण्याचा आजचा तिसरा दिवस आहे. ज्या बँकेशी तुमचा व्यवहार आहे, ती बँक जर बंद असेल तर तुम्हाला 17 मे म्हणजे उद्यापासून व्यवहार सुरु करता येणार आहेत.
कुठे-कुठे बँका बंद असतील?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, त्रिपुरा, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बंगाल, छत्तीसगड, झारखंड तसेच या राज्यात आज (16 मे)
बँका बंद राहणार आहेत. श्रीनगरमध्येही आज बँका बंद राहणार आहेत.
सलग तीन दिवस सुट्टी
बुद्ध पौर्णिमेनिमित्त 16 मे रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना बँकेत जाऊन व्यवहार करता येणार नाहीत. दरम्यान, 15 मे रोजी रविवार तर 14 मे रोजी दुसरा शनिवार असल्याने बँका बंद होत्या. म्हणजेच गेल्या आठवड्यात एकूण तीन दिवस बँका बंद होत्या.
या महिन्यात येणाऱ्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी
22 मे 2022 : रविवार
24 मे 2022: काझी नजरुल इस्माल यांचा जन्मदिवस - सिक्कीम
28 मे 2022: चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी
29 मे 2022 : रविवार
आज बुद्ध पौर्णिमा
भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणूनच याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे. या तिथीला बौद्ध धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान बुद्ध हा भगवान विष्णूचा शेवटचा आणि 9वा अवतार होता. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरुंपैकी एक होते.
Related Stories
Bank Holiday Today : आज 'या' शहरात बँका राहणार बंद, बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँकांना सुट्टी