Refrigerator Import Ban: रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी? मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत आहे विचार
Ban On Imported Refrigerator Likely: मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे.
Ban On Imported Refrigerator Likely: मेक इन इंडियाला ( Make In India) प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार ( Indian Government) रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. भारतात सॅमसंग ( Samsung) आणि एलजी सारख्या परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटर आयात करतात. लवकरच सरकार आयात करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक करू शकते, अशी चर्चा आहे. सध्या कंपन्या फ्री-इम्पोर्ट रेजिम ( Free Import Regime) अंतर्गत रेफ्रिजरेटर आयात करतात, ज्यात बदल करण्याचा सरकार विचार करत आहे. यावर लवकरच निर्णय होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न
भारताचा रेफ्रिजरेटर बाजार 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच वार्षिक 40,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. व्होल्टाससारख्या देशांतर्गत कंपन्यांव्यतिरिक्त गोदरेज या क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याचबरोबर एलजी आणि सॅमसंगसारख्या परदेशी कंपन्यांचा या क्षेत्रात मोठा दबदबा आहे. भारताची वार्षिक 24 मिलियन रेफ्रिजरेटर्स तयार करण्याची क्षमता आहे. परंतु केवळ 15 मिलियनची मागणी असून त्यापैकी मोठ्या संख्येने कंपन्या आयात करून ती पूर्ण करतात. भारतातील रेफ्रिजरेटरच्या विक्रीपैकी 5 ते 6 टक्के भाग आयातीतून भागवला जातो.
मेक इन इंडियाला मिळेल चालना
एलजी आणि सॅमसंगसारख्या कंपन्या आयातीद्वारे मोठ्या आणि उच्च श्रेणीतील रेफ्रिजरेटर्सची मागणी पूर्ण करतात. रेफ्रिजरेटरच्या आयातीवर बंदी घातल्याने मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मिशनला चालना मिळेल, असे मानले जाते. याआधी सरकारने एअर कंडिशनर आणि टेलिव्हिजनच्या आयातीवरही निर्बंध लादले आहेत. मोदी सरकारने रेफ्रिजरेटरच्या आयातीवर बंदी घातली तर त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादक कंपन्यांना होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
'प्लास्टिक स्ट्रॉ' वापरावर 1 जुलैपासून बंदी, 10 कोटी शेतकऱ्यांचे होणार नुकसान?
Birsa Munda : आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढणारे महान क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्याविषयी थोडक्यात...
Lawrence Bishnoi : सिद्धू मुसेवालाची हत्या असो, सलमान खानला जीवे मारण्याचा प्रयत्न; तुरुंगातून कारभार चालवतो 28 वर्षांचा 'लॉरेन्स बिष्णोई'!