एक्स्प्लोर

Odisha Rail Accident: ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

Odisha Rail Accident: ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई करत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली.

Odisha Rail Accident: ओदिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी (Odisha Railway Accident) सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे. 

आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 304 आणि कलम 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील महिन्यात 2 जून रोजी, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोरोमंडल एक्स्प्रेसने एका मालगाडीला धडक दिली होती. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डब्बे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसला आदळले.  या भीषण अपघातात 292 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, एक हजारांहून अधिक प्रवासी जखमी झाले होते. या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयच्या चौकशी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती. 

रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालात काय म्हटलं?

काही दिवसांपूर्वीच रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी (CRS) ओदिशातील रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे बोर्डाला स्वतंत्र चौकशी अहवाल सादर केला. या अहवालानुसार, "सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्यामुळे, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहंगा बाजार येथील स्टेशन व्यवस्थापकाने S&T कर्मचाऱ्यांना दोन समांतर ट्रॅकमधील त्रुटींबाबत सूचना दिली असती, तर ते उपायात्मक पावले उचलू शकले असते. बहनगा बाजार स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग गेट 94 वरील 'इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर' बदलण्याच्या कामासाठी स्टेशन-विशिष्ट मंजूर सर्किट सर्किट आरेख न पुरवणे हे चुकीचे पाऊल होते, ज्यामुळे चुकीची वायरिंग झाली."

टया अपघाताचं मुख्य कारण चुकीचा सिग्नल होता.' समितीने म्हटलं आहे की, सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) विभागाकडून अनेक पातळीवर चुका झाल्या होत्या. आधीच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती, असंही उच्चस्तरीय समितीने म्हटलं असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

इतर संबंधित बातमी:

महत्त्वाच्या बातम्या

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Embed widget