एक्स्प्लोर

Tripura : त्रिपुरात अटकेत असलेल्या दोन महिला पत्रकारांना जामीनावर सोडण्याचा न्यायालयाचा आदेश

Tripura : एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन वुमेन प्रेस कॉर्प्सने महिला पत्रकारांच्या अटकेचा निषेध केला होता. 

आगारतळा : त्रिपुरात अटक करण्यात आलेल्या दोन महिला पत्रकारांना गोमती सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या दोन महिला पत्रकारांना आसाम पोलिसांनी आसाम-त्रिपुराच्या सीमेवर अटक केली होती. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला होता. समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा असं या महिला पत्रकारांची नावं आहेत. 

विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यकर्त्यांने या दोन महिला पत्रकारांच्या विरोधात रविवारी त्रिपुरातील फाकिक्रोय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा या महिला पत्रकार 'एचडब्लू न्यूज नेटवर्क'च्या पत्रकार आहेत. या दोन पत्रकारांनी त्रिपुराची प्रतिमा खराब केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 

आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिला पत्रकारांना अटक केल्यानंतर रविवारी रात्री त्यांना सरकारी महिला आश्रय गृहात ठेवण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी त्यांना त्रिपुरा पोलिसांना सोपवण्यात येणार होतं. आसाम पोलिसांनी या दोन्ही महिला पत्रकारांना सिल्चर विमानतळाच्या रस्त्यावर अटक केली होती. त्रिपुरा पोलिसांनी आसाम पोलिसांना या दोन्ही महिला पत्रकारांना अटक करण्याची विनंती केली होती. त्यावरुन आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली होती. 

गोमती जिल्ह्यातील एका मशिदीला आग लावपण्यात आल्याची माहिती या महिला पत्रकारांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन दिली होती. 

या दोन महिला पत्रकारांना अटक केल्यानंतर एडिटर्स गिल्डने त्याचा निषेध केला होता. तसेच त्यांना तात्काळ सोडण्याचा आदेश दिला होता, तसेच त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचं स्वातंत्र्य देण्याचा आदेश दिला होता. 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
West Bengal Election : ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
IIT Baba Wedding: कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
कुंभमेळ्यातील IIT यन बाबाचं शुभ मंगल सावधान; अभयची अर्धांगिनी आहे तरी कोण, कधी केलंय लग्न?
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
अशोक खरातवर प्रश्न, शरद पवारांनी नेत्यांचे कान टोचले; म्हणाले, कोणी किती फोन केले, हे माझ्या वाचनात आलंय
Embed widget