एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही, असं हनीप्रीत म्हणाली.

नवी दिल्ली : बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत दिल्लीतच असल्याची माहिती समोर आली आहे. आज हनीप्रीतच्या वतीनं तिच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. दुपारी दोन वाजता या अर्जावर सुनावणी होणार आहे. हनीप्रीतच्या जामिन अर्जात काय? 'माझ्या जीवाला धोका आहे. मी बालपणापासूनच डेऱ्याशी जोडली गेले आहे. राम रहीमची मुलगी असणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हरियाणा पोलिसांनी माझं नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकलं आहे.' असं हनीप्रीतने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटलं आहे. मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही. माझ्याविरोधात कोणतीही केस नाही. जबरदस्ती मला गुन्ह्यात गोवलं जात आहे, असा दावाही तिने केला. 'मी एकटी आहे आणि मला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मला तपासात सहभागी व्हायचं आहे. मी कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाही. मला तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी कोर्टाकडे विनंती करते.' असं हनीप्रीतने अर्जात म्हटलं आहे. हनीप्रीत ही बेपत्ता झालीच नव्हती, सोमवारी ती स्वतः आपल्याला ऑफिसमध्ये भेटायला आल्याचा दावा हनीप्रीतच्या वकिलांनी केला. पोलिसांनी मात्र हनीप्रीत दिल्लीत असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप

हनीप्रीत ही आपली मानलेली मुलगी असल्याचं बाबा राम रहीम सर्वांना सांगायचा. मात्र हनीप्रीतचे बाबा राम रहीमशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिच्या घटस्फोटित नवऱ्याने केला होता. वकिलांच्या मार्फत हनीप्रीतने अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळून लावले. 'माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. बापलेकीच्या नात्याला चुकीच्या पद्धतीने जगासमोर आणण्यात आलं आहे' असा दावा तिने केला.

हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती

बाबा राम रहीमला शिक्षा झाल्यापासून आजपर्यंत हनीप्रीत फरार आहे. तिच्या चौकशीत बाबा राम रहीमचे अनेक काळे कारनामे पुढे येतील, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे हनीप्रीतविरोधात अटक वॉरट काढलं गेल्यानंतर तिचा शोध घेतला जात आहे. संबंधित बातम्या : पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्र हनीप्रीतचा शोध सुरुच, बिहारमधील सात जिल्ह्यात अलर्ट जारी हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget