एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना, गोविंदगिरी महाराज म्हणाले....

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. असा तपश्चर्या करणारा यापूर्वीचा राजा एकच केवळ छत्रपती शिवरायांनी यापूर्वी अशीच तपश्चर्या केली, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. असा तपश्चर्या करणारा यापूर्वीचा राजा एकच केवळ छत्रपती शिवरायांनी यापूर्वी अशीच तपश्चर्या केली, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपवास  सोडला. त्यांनी 11 दिवस अन्यत्याग केला होता.  गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजर्षी उपाधी दिली. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मंदिरात फक्त एका मूर्तीची प्रतिष्ठा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होऊ शकली. पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी सर्व नियमांचं पालन केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींची तपश्चर्या आणि अनुष्ठान बघता ह्या परंपरेला साजेल असा एकच राजा होता तो म्हणजे राजा शिवछत्रपती.   

पंतप्रधान मोदी यांनी फक्त तीन दिवसांचा उपवास करण्यास सांगितले होते. पण त्यांनी 11 दिवसांचा उपवास केला. एखाद्या राष्ट्रीय नेत्यांनी एवढा त्याग करणे सोपं नाही. असा तपस्वी राष्ट्रीय नेता प्राप्त होणे ही काही सामान्य बाब नाही, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपश्चर्येचं कौतुक करताना गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. 

तप करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा राहिली आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशेलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे. मला सन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले, असे गोविंददेव गिरी म्हणाले. आज आपल्याला तशाच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून जा भारत मातेची सेवा कर म्हणत परत पाठवलं, असे म्हणत गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडून मोदींचं कौतुक करण्यात आले.  गोविंदगिरी महाराजांकडून भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होताच गर्दीतून शिवरायांचा जयजयकार झाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget