एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येला जाताय? दुबई, सिंगापूरपेक्षा महाग आहे विमान प्रवास, एका तिकिटासाठी मोजावे लागणार एवढे पैसे

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, अयोध्येत जाण्यासाठी राम भक्त उत्सुक आहेत. दरम्यान, अयोध्येला जाण्यासाठी विमानप्रवास महागला आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान, अयोध्येतील या उद्घाटन सोहळ्यासाठी राम भक्त उत्सुक आहेत. दरम्यान, अयोध्येला जाण्यासाठी विमानप्रवास महागला आहे. दुबई, सिंगापूरपेक्षाही अयोध्येला जाण्यासाठी विमानाचे तिकीट जास्त आहे. अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु झाल्याने हवाई वाहतूक कंपन्यांनी प्रवासाचे दर वाढवले आहेत. 

दुबई, सिंगापूरपेक्षा अयोध्येला जाण्यासाठी विमानाचे तिकीट महाग

सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यसाठी हजर राहण्यासाठी राम भक्त प्रयत्न करत आहेत. 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी भक्तांचा ओढा वाढताना दिसत आहे. त्यातच अयोध्येला थेट विमानसेवा सुरु झाल्याने हवाई वाहतुकीचे दर वाढवण्यात आले आहेत. दुबई आणि बँकॉकपेक्षा अयोध्येला जाण्यासाठी तिकीट जास्त आहे. 

कसे आहेत विमान प्रवासाचे दर?
 
मुंबई ते दुबई - 16,937

मुंबई ते सिंगापूर -13,800 

मुंबई ते बँकॉक - 16,937 

मुंबई ते अयोध्या - 20,700  
 
अयोध्येत विमानसेवा सेवेला सुरुवात 

'अयोध्येत मर्यादा पुरोषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळा'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'इंडिगो'ने (Indigo)  दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्येतून दिल्ली आणि अहमदाबादसाठी फ्लाईट सुरु होणार आहेत. इंडिगो ही कंपनी अयोध्येतून व्यावसायिक दृष्ट्या 6 जानेवारीपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली. राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  22 जानेवारीला रामजन्मभूमीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत दाखल होतील. त्यामुळे इंडिगोने मुंबईतून फ्लाईट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण?

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील सर्व मान्यवरांना निमंत्रण पत्रही पाठविण्यात आली आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 6000 हून अधिक लोक या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा दिवस भारतात एखाद्या मोठ्या सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. याच दिमाखादार सोहळ्याचं निमंत्रण पत्र आता समोर आलं आहे.  अयोध्येत रामलालच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी  पाठवण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, मंदिराच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता प्रवेश करावा लागेल. कार्यक्रम किती तास चालेल? कार्यक्रमात कोणत्या गोष्टी आणणे बेकायदेशीर आहे? या सर्व गोष्टी निमंत्रण पत्रात लिहिलेल्या आहेत. तसेच 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत विशेष विधी होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध संप्रदायातील संतही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ram Mandir Inauguration: अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमात काँग्रेस सहभागी होणार नाही, भाजप आणि RSS चा इव्हेंट असल्याचा आरोप

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget