Credit Card Tips: डोळे झाकून क्रेडिट कार्ड वापरताय? हे धोके आधी पाहाच, अन्यथा फटका नक्की!
Credit Card Tips : गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषकरुन ऑनलाईन बिल पेमेंट आणि शॉपिंगसाठी लोकांकडून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय.
Credit Card Tips : गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषकरुन ऑनलाईन बिल पेमेंट आणि शॉपिंगसाठी लोकांकडून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातोय. पण हे एक प्रकारचं कर्ज आहे, नंतर चुकवावं लागते, हे क्रेडिट कार्ड वापरताना लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापताना सावधान राहिलं पाहिजे. पण काही ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर टाळला पाहिजे. आज, आम्ही अशाच गोष्टींची माहिती देणार आहोत.
एटीएममधून कॅश –
क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून कॅश काढणे, ही चांगली सुविधा असेल असं तुम्हाला वाटत असेल तर याबाबत एकदा नक्की विचार करावा लागेल. कारण, जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करुन एटीएममधून कॅश काढाल, तेव्हापासून व्याज सुरु होतं. तुम्हाला त्यासाठी वेळ दिला जात नाही. या रकमेवर तुम्हाला 2.5 ते 3.5 टक्के व्याज आकारलं जातं. यावर तुम्हाला फ्लॅट ट्रांजेक्शन टॅक्सही भरवा लागतो.
आंतरराष्ट्रीय ट्रांजेक्शन –
विदेशात क्रेडिट कार्डचा वापर केल्यास फॉरेन करन्सी ट्रांजेक्शन शुल्क आकारले जाते. तसेच एक्सचेंड रेटमधील चढ-उतारचाही प्रभाव पडतो. विदेशात जर तुम्हाला रोकड वापरायची नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड ऐवजी प्रिपेड कार्ड वापरु शकता.
क्रेडिट लिमिट –
क्रेडिट कार्ड वापरत असताना क्रेडिट लिमिट नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही क्रेडिट कार्ड लिमिटपेक्षा जास्त रक्कम खर्च केली तर कंपनी तुमच्यावर चार्ज लावते. क्रेडिट लिमिटचा 30 टक्केंपेक्षा जास्त वापर केल्यास सिबिल स्कोरवर वाईट परिणाम पडतो.
किमान देय रक्कम -
क्रेडिट कार्ड बिलामध्ये दोन प्रकारची देय रक्कम असते. एकूण देय रक्कम (Total Amount Due) आणि किमान देय रक्कम (Minimum Amount Due) याद्वारे तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल भरावं लागतं. किमान देय रक्कममध्ये कमी पैसे भरावे लागतात. पण जर तुम्ही या पर्यायाचा वापर करत असाल तर तुम्हाला मोठं व्याज चुकवावं लागते. व्याज पूर्ण रकमेवर लागतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचं बिल भरताना एकूण देय रकमेचा वापर करावा.
बॅलेन्स ट्रान्सफर –
क्रेडिट कार्ड वापरताना बॅलेन्स ट्रान्सफर या पर्यायाचा वापर विचारपूर्वक करा. बॅलेन्स ट्रान्सफर म्हणजे, आपण तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डचं बिल भरु शकता. पण यासाठी तुम्हाला काही प्रमाणात व्याज चुकवावं लागेल. एका कार्डचं बिल भरण्यासाठी दुसरं कार्ड, दुसऱ्याचं भरण्यासाठी तिसरं, तिसऱ्याचं भरण्यासाठी चौथं कार्ड, यासाठी बॅलेन्स ट्रान्सफरचा वापर करु नका, अन्यथा तुमचा सिबिल स्कोर खराब होईल.