एक्स्प्लोर

वैभव राऊतला घेऊन ATS ची टीम पुन्हा नालासोपाऱ्यात दाखल

9 ऑगस्टच्या रात्री महाराष्ट्र एटीएसने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरी धाड टाकत, अनेक विघातक स्फोटकांचा साठा जप्त केला आणि वैभव राऊत यालाही अटक केली. त्यानंतर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली.

नालासोपारा (पालघर) : स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या वैभव राऊतच्या नालासोपाऱ्यातील घरात पुन्हा एटीएसचे पथक दाखल झाले. विशेष म्हणजे, यावेळी एटीएसच्या पथकासोबत वैभव राऊतलाही नेण्यात आले होते. वैभव राऊत हा सोपारा गावातील भंडारआळीत राहतो. वैभव राऊतच्या घरी सर्चिंग ऑपरेशन सुरु असून, सध्या सोपारा गावात तणावाचं वातावरण आहे. मात्र, वैभव राऊतच्या पत्नीने गावकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केले आहे. यावेळी एटीएसने वैभव राऊतच्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीची तपासणी केली आणि त्यानंतर गाडी सोबत घेऊनही गेले. 9 ऑगस्टच्या रात्री महाराष्ट्र एटीएसने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरी धाड टाकत, अनेक विघातक स्फोटकांचा साठा जप्त केला आणि वैभव राऊत यालाही अटक केली. त्यानंतर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात 11 ऑगस्ट रोजी वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या संपर्कात असणाऱ्या 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. राज्यातील विविध भागातून या 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली होती. 10 ऑगस्ट रोजी एटीएसने कोर्टात काय माहिती दिली? - नालासोपाऱ्यात केलेल्या कारवाईत 20 गावठी बॉम्ब, 2 जिलेटिनच्या कांड्या हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. - शरद कळसकरकडे बॉम्ब कसा बनवायचा? याचा नोट सापडली, तर वैभव राऊतकडून 22 गोष्टी हस्तगत केल्या आहेत. शिवाय, सुधन्वा गोंधळेकर हा दोघांशी फोनवर संपर्कात होता. - बॉम्बचा वापर कुठे होणार होता?, कसा होणार होता? हे कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का? याचा तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले. कुणाचा कुणाशी संबंध? धक्कादायक म्हणजे, सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याचे सनातन प्रभात वृत्तपत्रातील एका वृत्तावरुन समोर आले आहे. शिवप्रतिष्ठान संघटना ही संभाजी भिडे यांची आहे. तर शरद कळसकर आणि वैभव राऊत हे दोघे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त आहेत. वैभव राऊतकडे काय काय सापडलं? 12 देशी बॉम्ब 2 जिलेटीन कांड्या 4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर 22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर सेफ्टी फ्यूज वायर 1500 ग्राम पांढरी पावडर विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या 6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स बॅटरी कनेक्टर कन्व्हरसह अन्य साहित्य प्रकरण काय आहे? महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे. एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे. एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget