एक्स्प्लोर

LIVE : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन

वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेजी यांचं निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यामुळे वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांची टीम सध्या वाजपेयींवर उपचार करत होते. परंतु 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची  प्राणज्योत मालवली.

LIVE UPDATE

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनी अटलजींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग यांच्याशी 15 मिनिटं चर्चा केली, चर्चेतून अटलजींच्या आठवणींना उजाळा - अटलजींच्या निधनामुळे पितृतुल्य छत्र हरपलं - नरेंद्र मोदी

- अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला - नरेंद्र मोदी

अंत्यदर्शन, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण (17 ऑगस्ट) :
▪️अंत्यदर्शन - दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान (स. 7.30 ते 8.30) ▪️अंत्यदर्शन - दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालय (स. 9 ते दु. 1) ▪️अंत्ययात्रा - दु. 1 वा. सुरुवात ▪️अंत्यसंस्कार - संध्या. 4 वा. राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती
UPDATE-  अटल बिहारी वाजपेयींचं निधन, देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अटलजींच्या निधनाने दुःखी झालो:पर्रिकर पणजी:माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने आपल्याला अतीव दुःख झाले असून भारताने अटलजींच्या रूपाने महान नेता गमावला आहे,अशी प्रतिक्रिया उपचारासाठी अमेरिकेत गेलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केली आहे. पर्रिकर यांनी आपल्या ट्वीट मध्ये वाजपेयी हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते असे म्हटले आहे.वाजपेयी यांनी आपले पूर्ण जीवन देशाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी वाहिले असल्याचा उल्लेख देखील पर्रिकर यांनी केला आहे.
छगन भुजबळांची प्रतिक्रिया
एक कुशाग्र बुद्धिमान व समर्पित लोकनेता तसेच निस्वार्थी, निस्पृह आणि निष्णात राजकारणी, ख्यातनाम कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे लोकशाहीची महती लक्षात घेऊन चालणारा महान नेता आज कायमचा हरपला असल्याच्या शोक भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
उत्तम मार्गदर्शकाला मुकलो : चंद्रकांत पाटील देशाचे माजी पंतप्रधान, संवेदनशील कवी, उत्तम वक्ते, पत्रकार, आमचे मार्गदर्शक, भारतरत्न आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने आम्ही सर्वजण एका उत्तम मार्गदर्शकाला मुकलो आहोत, त्यांची उणीव कधीही भरुन निघणार नाही. त्यांचे कार्य सर्व भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे, अश्या शब्दांत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
LIVE - वाजपेयी मला मुलगी मानायचे, मी त्यांना दद्दा म्हणायचे, त्यांच्या जाण्याने अतिव दु:ख - लता मंगेशकर
भाजपच्या सर्व कार्यालयांतील झेंडे निम्म्यावर आणले, भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही स्थगित
????अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी 6 ते 9 त्यांच्या निवासस्थानी (6 कृष्ण मेनन मार्ग, नवी दिल्ली) येथे ठेवण्यात येईल.
????सकाळी 10 ते 1 - पार्थिव भाजप केंद्रीय कार्यालयात ठेवणार
????दुपारी एक ते दीड वा. अंत्ययात्रेला सुरुवात
????संध्या. 5 वा 5 मिनिटांनी राजघाटवर अंत्यसंस्कार 
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार LIVE  संध्याकाळी साडे सहा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. ‪शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमवला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील. अटलजी अमर आहेत! : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली

माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी निधनाने मल अतिशय दु:ख झालं. विलक्षण नेतृत्त्व, दूरदृष्टी आणि अद्भूत भाषण हे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्त्व बनवतं. त्यांचं विराट आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आमच्या आठवणीत कायम राहिल : राष्ट्रपती

अटल बिहार वाजपेयी यांच्या निधनाने एका युगाचा अंत झालं. ते देशासाठी जगले आणि दशकभर त्यांनी देशाची सेवा केली. त्यांचं कुटुंब, भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे लाखो पाठीराखे यांच्याप्रति सांत्वन व्यक्त करतो : वाजपेयी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया 3.30 PM - माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत अद्यापही कोणती सुधारणा झालेली नाही, ते कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नसल्यानं त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली. अगदी थोड्याच वेळात म्हणजे संध्याकाळी साडे पाच वाजता वाजपेयींचं मेडिकल बुलेटीन जारी होणार आहे. 2.10 PM शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रात्री दिल्लीला रवाना होणार 1.50 PM पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह 'एम्स' रुग्णालयात पोहचले, अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दाखल, थोड्याच वेळात नवीन मेडिकल बुलेटीन 1.30 PM - अटल बिहारी वाजपेयींमुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी 12.50 PM - निगम बोध स्मशानभूमीची गाडी  एम्स रुग्णालयाजवळ पोहोचली, वाजपेयींची प्रकृती चिंताजनक 12.15 PM जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया - आपल्याला विसरुन चालणार नाही की अटल बिहारी वाजपेयी एक असे नेते आहेत, ज्यांची इच्छा होती भारताने अशी उंचा गाठावी, जिथे कोणताही देश स्पर्धाच करु शकणार नाही. ते शांतीप्रिय आहेत. डॉक्टरांशी माझी चर्चा झाली. प्रकृती अजूनही नाजूक आहे 12.05 PM - थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयात पोहोचणार 11.50 AM - अमित शाह भाजप मुख्यालयात दाखल 11.35 AM मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारनंतर दिल्लीला रवाना होण्याची शक्यता, अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत 11.20 AM - दिल्लीतील भाजप मुख्यालयातील हालचालींना वेग, कार्यालयातील फुलांचे हार काढले 11.08 AM -  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनकच,अजूनही ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर : एम्सचं मेडिकल बुलेटीन 10.50 AM 'एम्स'कडे दिग्गजांची रांग, पुढचा एक तास वाजपेयींच्या प्रकृतीच्या दृष्टीने महत्वाचा 10.40 AM AIIMS परिसरातील घडामोडींना वेग, काही क्षणात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं मेडिकल बुलेटीन, एम्स परिसरातील वाहनं हटवली 10.15 AM संपूर्ण देशाचं लक्ष सध्या दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलकडे लागलंय. पुढचा एक तास वाजपेयींच्या प्रकृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे 10.00 AM केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाठोपाठ लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल. एम्स हॉस्पिटल परिसरामध्ये व्हीआयपी वर्दळ वाढलीय 8.53 AM - भाजप अध्यक्ष अमित शाह एम्समध्ये पोहोचले 7.47 AM - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे दु:ख व्यक्त केलं. केजरीवाल यांनी याबाबत ट्विट केलं. "अटलजींच्या प्रकृतीबाबत ऐकून दु:ख झालं. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो" असं केजरीवाल म्हणाले. वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळीच एम्समध्ये हजेरी लावली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल बुधवारी संध्याकाळी एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली. मोदींनी 40 मिनिटांहून अधिक वेळ एम्समध्ये घालवला. पंत्यांच्या अगोदर भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रकृतीची विचारपूस केली होती. रात्री उशीरा हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनीदेखील एम्स रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही एम्सकडे धाव घेत वाजपेयींच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. 66 दिवसांपासून रुग्णालयात 93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत. याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक महत्त्वाचे नेत्यांनी एम्समध्ये जाऊन अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. वाजपेयींना मूत्र संसर्ग झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. वाजपेयींना नेमका कोणता कोणता त्रास? वाजपेयींनी किडनी संसर्ग, छातीदुखी, मूत्र संसर्ग हे त्रास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या 66 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. याशिवाय त्यांना मधुमेह अर्थात डायबिटीज आहे. शिवाय त्यांची एकच किडनी काम करते. 2009 पासून ते आजारी आहेत. 2009 मध्ये त्यांना स्मृतीभ्रंशाचा झटका आला होता, तेव्हापासून त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. जिंदादिल राजकारणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झाले नाहीत, तर एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही आपलं व्यक्तिमत्त्व लोकांसमोर ठेवलं. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य बनलं आहे. अटल बिहारी वाजपेयी मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर आहेत. ते आता 93 वर्षांचे आहेत. तीन वेळा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. पहिल्यांदा 1996 मध्ये ते पंतप्रधान झाले. मग 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. पत्रकार, राजकारणी, कवी, लेखक वाजपेयी हे केवळ राजकारणी नाहीत तर त्यांनी पत्रकार, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रात काम केलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आलं होतं, तेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते.श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत मृत्यू झाला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात येण्याचं निश्चित केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी कवी, लेखक म्हणूनही नाव कमावलं होतं. भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांना मोदी सरकारने 2015 मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने गौरवलं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचवेळी त्यांचा अनेक वर्षांनी फोटो समोर आला होता. संबंधित बातम्या  वाजपेयींची प्रकृती गेल्या 24 तासांपासून चिंताजनक : AIIMS
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget