(Source: Poll of Polls)
मोठी बातमी! उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, रेल्वेचे डब्बे रुळावरुन घसरले, 4 जणांचा मृत्यू
Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत.
Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वेचा भीषण अपघात झालाय. या अपघातमध्ये 10 डबे रुळावरून घसरल्याचं समोर आलेय. पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेय. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरु आहे.
घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. जवळपास 40 सदस्यीय वैद्यकीय पथक आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित आहेत. या दुर्दैवी घटनेच्या संदर्भात हेल्पलाइन क्रमांक 8957400965 आणि 8957409292 सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी या घटनेबाबात माहिती दिली. ते म्हणाले की, चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरुन खाली घसरले. गोंडा-गोरखपूर रेल्वे सेक्शनवरील मोतीगंज आणि झिलाही रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातामुळे संबंधित रेल्वे विभागावरील कटिहार-अमृतसर एक्स्प्रेस आणि गुवाहाटी-श्रीमाता वैष्णोदेवी कटरा एक्स्प्रेस अन्य मार्गावर वळवण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath takes cognisance of the train accident in the Gonda district. He directs the officials to reach the spot immediately and expedite the relief work; gives instructions for proper treatment of the injured: CMO
— ANI (@ANI) July 18, 2024
(file pic) https://t.co/ggCTJKwmq3 pic.twitter.com/FxmUZqzTqH
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून या अपघात प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
VIDEO | A few bogies of Dibrugarh Express derailed near UP's Gonda railway station earlier today. Details awaited. pic.twitter.com/SfJTfc01Wp
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2024
सीएम योगी आदित्यनाथ यांच्याकडून मदतकार्य करण्याचे निर्देश
दिब्रूगड एक्स्प्रेसच्या अपघाताची माहिती मिळताच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासोबत याबाबत चर्चा केली. त्यासोबतच अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सीएचसी, प्राथमिक आरोग्य केंद्रांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. एसडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.