एक्स्प्लोर

पोटनिवडणूक : 3 जागांवर भाजप, तामिळनाडूत जयललितांच्या जागी दिनाकरन

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरकेनगरमध्ये अपक्ष उमेदवार दिनाकरन यांचा विजय झाला.

नवी दिल्ली : चार राज्यातील पाच विधानसभांच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आरकेनगरमध्ये अपक्ष उमेदवार दिनाकरन यांचा विजय झाला. भाजपने उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद विधानसभा मतदारसंघ आणि अरुणाचल प्रदेशातील दोन जागांवर विजय मिळवला. उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही ठिकाणी सध्या भाजपचीच सत्ता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. उत्तर प्रदेशचा निकाल यूपीतील सिकंदराबाद मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अजीत पाल यांनी विजय मिळवला. त्यांनी समाजवादी पक्षाच्या सीमा सचान यांचा 11 हजार 161 मतांनी पराभव केला. भाजप आमदार मथुरा प्रसाद पाल यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. तामिळनाडूत भाजपला नोटापेक्षाही कमी मतं दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर आरकेनगरमधील जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी जयललिता यांचा पक्ष एआयएडीएमकेच्या विरोधी गटाचे उमेदवार टीटीव्ही दिनाकरन यांनी विजय मिळवला. दिनाकरन यांनी या विजयानंतर मरीना बीचवर पक्षाचे संस्थापक एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दरम्यान, पलानीसामी सरकार तीन महिन्याच्या आत पडणार असल्याचा दावा यावेळी दिनाकरन यांनी केला. जयललिता यांनी 2015 च्या पोटनिवडणुकीत आणि 2016 च्या निवडणुकीत आरकेनगरमधून विजय मिळवला होता. भाजप उमेदवाराला या निवडणुकीत 'नोटा'पेक्षाही कमी मतं मिळाली. अरुणाचल प्रदेशचा निकाल अरुणाचल प्रदेशातील पाक्के कसांग आणि लिकाबली मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. 60 जागा असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेत आता भाजपचे 49 आमदार झाले आहेत, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे 9, काँग्रेसचा एक आणि एक अपक्ष उमेदवार आहे. पश्चिम बंगालचा विजय पश्चिम बंगालच्या सबांग विधानसभा मतदारसंघातील या पोटनिवडणुकीत तृणमुल काँग्रेसने (टीएमसी) विजय मिळवला. टीएमसीच्या गीता रानी भुनिया यांनी माकपच्या रिता मंडल यांचा 64 हजार 192 मतांनी पराभव केला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DRDO Bomb Test : शत्रूची आता खैर नाही! DRDO कडून 'हाय कॅलिबर बॉम्ब'ची यशस्वी चाचणी
शत्रूची आता खैर नाही! DRDO कडून 'हाय कॅलिबर बॉम्ब'ची यशस्वी चाचणी
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget