एक्स्प्लोर

Ashok Dinda |  भाजप उमेदवार अशोक दिंडा यांच्यावर तृणमूल समर्थकांचा हल्ला, खांद्याला आणि पाठीला जबर मार

West Bengal Election | माजी क्रिकेटपट्टू आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे (BJP) उमेदवार अशोक दिंडा (Ashok Dinda) यांच्या गाडीवर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) समर्थकांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. 


कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता तिथले राजकीय वातावरणही तापल्याचं पहायला मिळतंय. माजी क्रिकेटपट्टू आणि पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरच्या मोयना विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अशोक दिंडा यांच्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला आहे. अशोक दिंडा यांनी एका निवडणूक प्रचारसभेत भाग घेतला होता. त्यावेळ तृणमूल समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अशोक दिंडा यांच्या गाडीवर पन्नासहून जास्त लोकांनी हल्ला केला. त्यामध्ये त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान करण्यात आलं आहे. तसेच भाजप उमेदवार अशोक दिंडा यांच्या खांद्याला आणि पाठीलाही जबर मार लागला आहे. आपल्यावर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच हल्ला केल्याचा आरोप अशोक दिंडा यांनी केला आहे. या घटनेची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून जिल्हा प्रशासनाकडून त्यांनी या घटनेचा अहवालही मागवला आहे.

अशोक दिंडा यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, अशोक दिंडा हे मोयना एक रोड शो करुन मोयना बाजारमध्ये आल्यानंतर तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता शाहजहा अली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काठ्या, सुऱ्या आणि विटांच्या सहाय्याने अशोक दिंडा यांच्या गाडीवर हल्ला केला. अशोक दिंडा यांनी केलेल्या या आरोपाचे तृणमूल काँग्रेसकडून खंडण करण्यात आले असून हा भाजपचा अंतर्गत वाद असल्याची टिप्पणी केली आहे. 

दुसऱ्या टप्प्यासाठी गुरूवारी मतदान
पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 30 विधानसभेच्या जागांसाठी गुरूवारी मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 171 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. या 171 उमेदवारांत 19 उमेदवार या महिला आहेत. भाजपने आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने या 30 ही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर सीपीएमने 15, काँग्रेसने 9, सीपाआयने 2 आणि इतर घटक पक्षांनी 2 उमेदवार उभे केले आहेत. 

या दुसऱ्या टप्प्यात राज्यासह देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्रामच्या मतदारसंघाचा समावेश आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दू अधिकारी निवडणूक लढवत आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Embed widget